Share

krupal tumane : राज्यात राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा पडणार मोठे खिंडार, तब्बल आठ…

Uddhav Thackeray

krupal tumane shocking statement on thackeray shivsena  | एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात एकच खळबळ उडवली होती. ४० आमदारांनंतर शिवसेनेचे १२ खासदारही शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या गटात प्रवेश घेणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. अशात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आठ जिल्हा प्रमुख नागपूरात होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शिंदे गटात दाखल होतील, असा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे चार माजी आमदारही आमच्या संपर्कात आहे, असा दावाही कृपाल तुमाने यांनी केला आहे.

कृपाल तुमाने यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे जेव्हा विदर्भ दौऱ्यावर गेले होते. तेव्हा युवा सेनेच्या सहा जिल्हाप्रमुखांनी मुंबईत जाऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे राज्याचे राजकारण खुप तापले होते.

अशात कृपाल तुमाने यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ते म्हणाले की, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. पण काही कारणामुळे त्यांना उशीर झाला. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ विदर्भातील आठ जिल्हा प्रमुख शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात येणार आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, हा प्रवेश सोहळा हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार आहे. काँग्रेसचे चार माजी आमदाराही आमच्या संपर्कात आहे. ते सुद्धा याच कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहे. तुमाने यांनी यावेळी त्यांचे नावे सांगणं मात्र टाळलं आहे.

तसेच याआधीही कृपाल तुमाने यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की ठाकरे गटातील दोन खासदार शिंदे गटात येणार आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही. काही नियमांच्या अडचणीमुळे ते होऊ शकले नव्हते. पण आता तसे होणार नाही, असेही तुमाने यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
जिच्यावर विश्वास टाकला तिनेच धोका दिला! ठाकरेंची आक्रमक वाघिन शिंदे गटात सामील
राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने खरेदी केले ‘या’ 6 कंपन्यांचे शेअर्स; होणार बक्कळ कमाई
Shivsena: बिग ब्रेकींग! शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर; १०० दिवसांनी होणार तुरूंगातून सुटका

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now