Share

अभिनेता सकाळी म्हणाला, योगीजी आज तुमचा शेवटचा दिवस आहे; कल समोर येताच घेतला युटर्न

UP Election 2022

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीस आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. काही वेळातच निकाल सर्वांसमोर येणार आहेत. यादरम्यान आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार उत्तरप्रदेशमध्ये (UP Election 2022) पुन्हा एकदा योगी सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर यूपीत भाजप सरकार सत्तेत येणार असल्याचे पाहून एका अभिनेत्याने योगी आदित्यनाथ यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लोकांनी या अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शुभेच्छा देऊन ट्रोल झालेला अभिनेता म्हणजे केआरके. स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणून सांगणारा केआरके अर्थात कमाल आर खानने आज सकाळी एक ट्विट केलं होतं. यामध्ये त्याने लिहिले होते की, ‘गुड मॉर्निंग योगी जी. की हाल बा. आज तुमचा शेवटचा दिवस आहे सर. म्हटलं तुम्हाला आठवण करून देऊ’.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1501726788027879430?s=20&t=Vlc9-AbXSzw7CbcErN6elw

याशिवाय केआरकेने १७ फेब्रुवारी रोजी एक ट्विट केला होता. त्यामध्ये त्याने म्हटले होते की, ‘आज मी वचन देतो. जर १० मार्च रोजी उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हरले नाही तर मी भारतात कधीच परतणार नाही. जय बजरंग बली’. पण आता मात्र कल समोर येताच केआरकेचे सूर बदलले आहेत.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1494175583424679936?s=20&t=lYXInewqChEl3rdGaakSHQ

 

सकाळी ट्विट करत योगी आदित्यनाथ यांना टोमणा मारणाऱ्या केआरकेने मतदानाचे कल समोर येताच त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याने योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनासुद्धा टॅग करत लिहिले की, उत्तरप्रदेश पुन्हा जिंकण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1501765181105479681?s=20&t=YRVCgFfuz-CRE-HXXL-lYQ

केआरकेच्या या ट्विटनंतर लोक त्याची सोशल मीडियावर क्लास घेण्यास सुरुवात केली. केआरकेला ट्रोल करत एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘मेडिकलला जा आणि बर्नल खरेदी करून लावून घे’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘काय रे फलटू. लवकर रंग बदललास तुझा’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘तुझं सांग. तू हिंदुस्तानमधून कधी बाहेर जाणार आहेस? म्हटलं तुझं वचन तुला आठवण करून द्यावं’.

यासारखे अनेक कमेंट करत लोक केआरकेला ट्रोल करत आहेत. यादरम्यान बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि आरजे प्रीतम सिंहने केआरकेला टॅग करत विचारले की, ‘हाहाहा केआरके हे काय झालं यूपीमध्ये’. त्यानंतर केआरकेने प्रीतमचा ट्विट रिट्विट करत लिहिले की, ‘भावा त्यांनी १५ लाखाला एक विनोद म्हटले. तर मीसुद्धा मी दिलेल्या वचनाला एक विनोद म्हणू शकतो. तसंही आता मी बाहेर आहे त्यामुळे बहुतेक मला असं काही करावं लागणार नाही’.

महत्त्वाच्या बातम्या :
भाजपला सोडून समाजवादी पार्टीत सामिल होणे पडले महागात, स्वामी प्रसाद मौर्य यांचा दारूण पराभव
”अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल..हारले..एक मासो आणि खंडी भर रस्सो!”
ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेसचा आरोप, दिल्लीत कार्यकर्त्यांचे आंदोलन

बाॅलीवुड मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now