Share

KRK ने उडवली ‘गेहराइयां’ चित्रपटाची खिल्ली; दीपिकाला म्हणाला, सेक्सची मल्लिका, तर सिद्धांतला म्हणाला..

Gehraiyaan A Soft Porn Film

स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणून सांगणारा कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके या नावाने प्रसिद्ध असलेला कमाल आर खान नेहमी बॉलिवूडवर निशाणा साधत असतो. आताही त्याने दीपिका पादुकोणच्या ‘गेहराइयां’ या चित्रपटाचे समीक्षण करताना चित्रपटाला सॉफ्ट पॉर्न (Gehraiyaan A Soft Porn Film) म्हटले आहे. सोबतच त्याने करण जोहरवरही निशाणा साधला आहे.

केआरकेने एकामागून एक असे अनेक ट्विट करत दीपिकासोबत करण जोहर आणि सिद्धांत चतुर्वेदीवरही असभ्य टिप्पणी केली आहे. पहिल्या ट्विटमध्ये केआरकेने लिहिले की, ‘आता मी सॉफ्ट पॉर्न चित्रपट पाहत आहे. जे सेक्सचा देव करण जोहर आणि सेक्सची मल्लिका दीपिका पादुकोण यांचे आहे’.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1492009178755444749?s=20&t=dxrdKGKSPPO56gXo9bhfIA

पुढच्या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, ‘गेहराइयां चित्रपटाला दीपिकाची बायोग्राफी म्हणता येते. कारण तिला केवळ पैसा आणि मजा पाहिजे’. यासोबतच त्याने चित्रपटातील डायलॉग्सवरही टीका केली आहे. केआरके दीपिका आणि करणवरच न थांबता अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीवरही निशाणा साधला आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1492019718097616897?s=20&t=dxrdKGKSPPO56gXo9bhfIA

‘गेहराइयां’ चित्रपट पाहतच केआरके चित्रपटाचे समीक्षण करत होता. त्याने ट्विट करत लिहिले की, ‘झुग्गी अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दिग्दर्शकाने पूर्णवेळ त्याला झुग्गी टाईप ड्रेस घालण्यास दिली. हे सॉफ्ट पॉर्न चित्रपट पूर्णपणे इंग्लिश चित्रपट वाटत आहे. सर्वजण इंग्लिशमध्येच बोलत आहेत. तेव्हा चित्रपट हॉलिवूडमध्येच बनवायचे होते. कॉपिवूडमध्ये का बनवले?’

https://twitter.com/kamaalrkhan/status/1492012577907527681?s=20&t=dxrdKGKSPPO56gXo9bhfIA

पुढच्या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, ‘गेहराइयांमध्ये झुग्गी अभिनेत्याला अब्जाधीश म्हणून दाखवण्यात आले. पण तो अजिबात तसा दिसत नाही. ज्याच्या तोंडावर लुक्का लिहिलेले असेल तो अब्जाधीशसारखा कसा दिसेल? काय मजाक आहे’. केआरकेचे हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1492018310057238539?s=20&t=dxrdKGKSPPO56gXo9bhfIA

दरम्यान, दीपिकाचा ‘गेहराइयां’ हा चित्रपट शुक्रवारी (११ फेब्रुवारी) अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे कथानक या चार कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांभोवती फिरते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले असून चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…
‘जे पुरूष नियमितपणे पॉर्न पाहतात त्यांना किस करता येत नाही’, अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now