पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेला कथित गैरव्यवहार मांडणारे चार पानांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लेटर बॉम्बने पुन्हा एकदा खळबळ आहे. हे पत्र पोलीस दलातील अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं असल्याचं बोललं जातं आहे. याचबरोबर काही दिवसांपूर्वीच आयपीएस कृष्णप्रकाश यांची बदली झाली होती. बदली झाल्यानंतर ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असल्याची देखील माहिती हाती आली आहे.
अशातच आता या प्रकरणावर खुद्द कृष्ण प्रकाश यांनी भाष्य केलं आहे. सदर पत्र खोटे असल्याची माहिती कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना पुढे कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘अशा प्रकारचे विघ्नसंतोषी लोकांचे आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे.’
याचबरोबर सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं असल्याचं बोललं जातं आहे. त्यांना याबाबत विचारलं असता ‘प्रत्यक्षात हे पत्र आपण लिहिलं नाही,’ असा दावा डोंगरे यांनी केला आहे. मात्र, ‘सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याच कृष्ण प्रकाश यांनी म्हंटले आहे.
तसेच सदर लेटर हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापुर्वी देखील वारंवार केले गेले होते, अशी माहिती देखील कृष्ण प्रकाश यांनी दिली. दरम्यान आता या पत्रामुळे सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या अडचणी वाढणार असल्याच दिसून येत आहे.
वाचा काय म्हंटल आहे त्या व्हायरल पत्रात..? पत्रात असे म्हटले आहे की, ‘कृष्ण प्रकाश यांनी दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता आहे. कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा हे स्वतंत्र पथक स्थापन करून त्याचे प्रमुख पद दिले. सामाजिक सुरक्षा पथकाच्या बरोबरीने वाचक शाखेचे काम बघण्यास सांगण्यात आले.’
दरम्यान, पत्रातून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ‘पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनाच पाठविण्यात आले आहे. सध्या यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भरमैदानात सूर्यकुमार यादवने घेतली व्हाएग्राची गोळी? व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ
‘राज्याचे केंद्राकडे नाही तर केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी’; केंद्रीय मंत्र्याने ठाकरेंना सुनावले
लग्नाच्या वरातीत डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू; पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून डॉक्टर हदारले
अजित पवार, दानवे, राणांसह ३७२ बड्या नेत्यांचा वीजबील थकबाकीचा आकडा आला समोर: वाचा यादी