Share

प्रेग्नेन्सीदरम्यान प्रेग्नेंन्ट न दिसणंही गुन्हा का? ट्रोलर्सला अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

Kratika Sengar

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका सेंगर (Kratika Sengar) लवकरच आई होणार आहे. कृतिकाने १२ नोव्हेंबर २०२१ रोजी तिच्या प्रेग्नेन्सीची घोषणा केली होती. तर आता कृतिका तिच्या गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात असून सध्या ती प्रेग्नेन्सीचा काळ एन्जॉय करत आहे. यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना कृतिकाने प्रेग्नेन्सीदरम्यान करण्यात येणाऱ्या बॉडी शेमिंगच्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

प्रेग्नेन्सीदरम्यान अनेक महिलांना बॉडी शेमिंगमधून जावे लागते. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. हे अगदी नैसर्गिक आहे. परंतु, अशा परिस्थितीतही अनेकजण महिलांची खिल्ली उडवताना दिसून येतात. यामध्ये जर एखादी अभिनेत्री असेल तर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागते.

अभिनेत्री कृतिका सेंगरलासुद्धा अशा बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले आहे. याचा खुलासा कृतिकाने फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना केला आहे. कृतिकाने म्हटले की, ‘मी अशा अनेक लोकांना पाहिले जे एखाद्या अभिनेत्रीला तिच्या प्रेग्नेन्सीदरम्यान वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करतात. मला वाटतं हे लोक बुद्धीहीन आहेत’.

‘तुमच्या शरीरात एक जीव वाढतोय. त्यामुळे साहजिकच तुमच्या शरीरात बदल होतात. परंतु, अशा परिस्थितीत शरीरात बदलच होणार नाहीत, अशी अपेक्षा करणे मुर्खपणा आहे. लोक या गोष्टीचा आनंद साजरा करण्याऐवजी त्यात त्रुटी काढण्यात, टीका करण्यातच वेळ घालवतात’.

कृतिकाने पुढे म्हटले की, ‘जेव्हा मी प्रेग्नेंन्ट नव्हते तेव्हा लोक म्हणत असत की, मी प्रेग्नेंन्ट आहे. पण आता मी आई होणार आहे तर लोकांना वाटतंय की, मी प्रेग्नेन्ट असल्यासारखं दिसतच नाही. काही लोकांनी तर मर्यादाच ओलांडली. मी प्रेग्नेन्ट दिसत नाही म्हणून आम्ही सरोगसीच्या पर्यायाची निवड केल्याचं म्हटलं’.

दरम्यान कृतिका सेंगरे ‘चेन्नई एक्सप्रेस’ मधील थंगबली अर्थात अभिनेता निकितिन धीरसोबत लग्न केले आहे. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३ सप्टेंबर २०१४ साली दोघे विवाहबंधनात अडकले. तर लग्नाच्या सात वर्षानंतर ते आता लवकरच आई-बाबा होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
कॅमेऱ्याजवळ येताच उप्स मोमेंटची शिकार झाली दिपीका पादूकोन, गाडीतून उतरताच.., पहा व्हिडीओ
VIDEO: उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ झाला लीक, सोशल मिडीयावर उडाली खळबळ
VIDEO: ‘धाकड’ चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज; चाहते म्हणाले, ‘कंगना फायर आहे, बॉलिवूडला आग लावणार’

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now