Share

केकेआरला मोठा झटका! संघाचा मुख्य आधार असणारे दोन दिग्गज खेळाडू पहील्या पाच सामन्यांना मुकणार

सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे सुरू झाले आहे. क्रिकेटप्रेमी आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच यंदाच्या हंगामात आणखी दोन संघाची नोंद झाली आहे. तसेच सामन्यांचे वेळापत्रक देखील मागील काही दिवसांपूर्वी जाहीर झाले. या हंगामाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार आहे. याच दरम्यान कोलकाता संघाबाबत एक माहिती समोर आली.

कोलकाता संघाचे मुख्य मार्गदर्शक डेव्हिड हसी यांनी बुधवारी (२३ मार्च) ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “आयपीएल २०२२ मध्ये कोलकाता संघाचे दोन दिग्गज खेळाडू पहिल्या पाच सामन्यात खेळू शकणार नाहीत.” म्हणजेच कोलकाता संघ चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाविरुद्ध पहिले पाच सामने असणार आहे. या सामन्यात हे खेळाडू दिसणार नाहीत. ते म्हणजे पॅट कमिन्स आणि अरोन फिंच.

जे सध्या आपल्या संघाकडून पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. त्यामुळे हे दोन खेळाडू पहिल्या पाच सामन्यात खेळू शकणार नाहीत. डेव्हिड हसी म्हणाले की, “तुम्हाला वाटत आहे की, हे सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळावेत. पण प्रत्येक क्रिकेटपटूने त्यांच्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या बांधिलकी अशीच हवी आहे. मला माहिती की, कमिन्स आणि फिंच हे पहिल्या पाच सामन्यात खेळू शकणार नाहीत. पण ते आणखी सामने खेळण्यास चांगल्या पद्धतीने तयार होतील.”

तसेच यंदाच्या हंगामात कोलकाता संघाचा नवा कर्णधार आपल्याला मैदानावर पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे श्रेयस अय्यर हा होय. श्रेयस अय्यरला फ्रँचायझीने मेगा ऑक्शनमध्ये १२.२५ कोटी रुपये खर्च करून विकत घेतले. तसेच हसी यांनी श्रेयस अय्यरबद्दल ही आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी श्रेयस अय्यरला जन्मापासून लीडर असल्याचे म्हटले आहे.

हसी म्हणाले की, “श्रेयस हा जन्मापासून लीडर आहे. तो ज्या पद्धतीने मैदानावर येतो आणि कमांड सांभाळतो, त्यामुळे सर्व खेळाडूंचा आदर वाढतो. या अगोदर श्रेयसने दिल्ली संघासाठी ही चांगले कर्णधारपद भूषवले आहे. त्याच्याकडे खूप चांगले क्रिकेट बुद्धी आहे आणि खूप चांगला दृष्टिकोन देखील आहे. मला वाटते की, तो आणखी पुढे जाऊन स्वतःला खूप चांगले व्यक्त करेल.”

त्याचबरोबर त्यांना पुढे विचारण्यात आले की, कोलकाता संघाकडे यष्टिरक्षण विभागात महत्त्वाच्या खेळाडूची कमतरता आहे का? यावर उत्तर देत हसी यांनी सौराष्ट्रचा यष्टिरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन आणि इंग्लंडचा सॅम बिलिंग्स यांचा पर्याय म्हणून उल्लेख केला. तसेच हसी यांनी अजिंक्य रहाणेला आयपीएल २०२२ मध्ये कोलकातासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी पाठिंबा देखील दिला आहे.

 

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now