Share

कोल्हापूरच्या तरुणांना गोव्यात बेदम मारहाण; स्वस्तात जेवनाचे आमिश दाखवून लुटले पैसे अन् दागिने

सध्या पर्यटनसाठी लोक अनेक ठिकाणी जातात. त्यात पर्यटकांचे फिरण्याचे प्रमुख ठिकाण गोवा नक्कीच असते. मात्र याच गोव्यात सध्या पर्यटकांसाठी ‘सावधान’ अशी पाटी लावली जात आहे. त्याचं कारण म्हणजे, गोव्यात पर्यटकांना फसवणारी टोळी सक्रिय झाली आहे.

पर्यटकांची फसवणूक या टोळीकडून होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधून काही युवक गोव्यात आपली सुट्टी घालवण्यासाठी गेले असताना, त्यांना देखील या टोळीचा फटका सहन करावा लागला आहे. त्यांची गोव्यात फसवणूक करण्यात आली आहे.

कोल्हापूरमधील हे तीन तरुण गोव्यात पर्यटनासाठी गेले होते. हे तरुण गोव्याच्या किनारी धमाल मस्ती करत असतानाच एका टोळीने त्यांना गाठलं. त्यानंतर हे तरुण गोव्याहून परतत असताना देखील या टोळीने चांगलं आणि स्वस्त जेवण देतो असं सांगून एका ठिकाणी त्यांना नेले. पण त्या ठिकाणी कोणतेही हॉटेल किंवा मेस नव्हती उपलब्ध नव्हती. तरुणांना फसवून टोळक्यांनी अज्ञान ठिकाणी आणले.

कोल्हापूरच्या या तरुणांना आपण फसले गेलो हे कळायच्या आत या तरुणांना टोळक्यांनी धमकावत एका रूममध्ये कोंडून बेदम मारहाण केली. तरुणांजवळचे असलेले सगळे पैसे, सोनं आणि अन्य मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. तरुणांची कपडे काढून मारहाण केली.

एवढेच नाही तर त्यांच्याकडे ऑनलाइन असलेले पैसे देखील चाकूचा धाक दाखवून काढून घेतले. त्यानंतर तरुणांना त्या खोलीत बंद करून लूटमार करणारी, फसवणूक करणारी ही टोळी पळून गेली. त्यानंतर कोल्हापूरच्या या तरुणांनी आपली सुटका करून घेतली आणि मदतीने थेट कोल्हापूर गाठलं.

तुम्हांला देखील तुमची सुट्टी आनंदात घालवण्यासाठी गोव्यात जायचे असेल तर नक्की जावा, पण अशा फसवणूक करणाऱ्या टोळक्यांपासून सावध राहा. जी घटना कोल्हापूरच्या तरुणांसोबत घडली ती तुमच्या सोबत होत आहे, या गोष्टीची चाहूल लागली तर लवकरात लवकर सावध होऊन योग्य ते पाऊल उचला.

इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now