राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चर्चा सुरू आहे. अशातच ‘थेट कोणत्याच पक्षात मी प्रवेश करणार नाही,’ अशी ठाम माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) याणी घेतली आहे. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढवणार असल्याचे संभाजीराजे यांनी निश्चित केले आहे.
ते याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही. महाविकास आघाडीसह अन्य कोणत्या पक्षांनी माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्याला माझी काही हरकत नाही,’ असे संभाजीराजे यावेळी बोलताना स्पष्टच म्हणाले.
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, ‘खासदार होवो अगर न होवो.. माझी यापुढील वाटचाल स्वराज्य संघटनेचे काम करतच सुरु राहील. याचबरोबर मी माझी भूमिका सगळ्या पक्षांसमोर मांडली आहे. गेली दहा वर्षे समाजासाठी मी जे काम करत आहे त्याची दखल घेऊन सर्व पक्षांनी मला पाठबळ द्यावे ही,’ अशी इच्छा संभाजीराजे यांनी बोलून दाखवली आहे.
दरम्यान, अखेर राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी सुरू असलेला पेच आता संपलेला आहे. शिवसेनेकडून छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देण्यात आलेली नाहीये. अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र अद्याप संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाहीये.
याबाबत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “संजय पवार यांचं नाव अंतिम झालं आहे. पवार शिवसेनेचे मावळे असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा केली जाईल,” अशी माहिती राऊत यांनी दिली.
याचबरोबर “दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि उमेदवार विजयी होतील”, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोणाची लॉटरी लागते? यासाठी अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
जेव्हा मिमिक्रीमुळे वादात सापडली होती सुगंधा मिश्रा, कंगनाने दिली होती थेट ‘ही’ धमकी, वाचा किस्सा
पाकिस्तानी गायकाने करण जोहरवर लावला गाणं चोरल्याचा आरोप, T-series ने दिले चोख प्रत्यु्त्तर, म्हणाले.
cannes 2022: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात रेड कार्पेटवर आंदोलन, फेकले स्मोक ग्रॅनेड