३ मे रोजीच कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले हे भाजपने शिफारस केलेले राष्ट्रपती नियुक्त माजी राज्यसभा सदस्य आहेत. आता त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. संभाजीराजेंची राजकारणात पुढील भूमिका काय असेल असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
अशातच एक वेगळी बातमी समोर येत आहे. तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीराजे भोसले यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर संभाजीराजे भोसले यांनी थेट मंदिर प्रशासनाला फोन करून झापले आहे.
या प्रकारानंतर संभाजीराजे भोसले यांचे कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले. मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. याचबरोबर या घटनेमुळे संभाजीराजे यांचा अपमान झाला असल्याच मराठा क्रांती ठोक मोर्चानं म्हंटलं आहे.
तर दुसरीकडे गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्यानंतर तातडीने संभाजीराजे छत्रपती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. घडल्या प्रकाराबाबत माहिती देत अधिकाऱ्यांना राजेंनी खडेबोल सुनावले. दरम्यान, या घटनेवेळी मंदिरातून बाहेर पडताना संभाजीराजे भोसले यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये संभाजीराजे भोसले संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलताना दिसत आहेत. संभाजीराजे फोनवर म्हणतात, “आमचा पहिला अभिषेक होता. आणि आम्हालाच गाभाऱ्यात प्रवेश नाही? उद्या परत फोन करतो”, असं संभाजीराजे भोसले या फोन वर म्हंटलं आहे. यामुळे आता या प्रकरणाला पुढे काय वळण लागणार? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचा नेमकं घडलं काय..? काल संभाजीराजे भोसले तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. व्यवस्थापनाने नियम सांगत संभाजीराजे यांना प्रवेश नाकारला. त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंसाठी फडणवीस मैदानात..; युपीतील भाजप खासदारांना केले ‘हे’ आवाहन
एकाचा विरोध तर एकाचा पाठिंबा! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजप खासदाराची जय्यत तयारी
राज ठाकरेंच्या पत्राला आदित्य ठाकरेंनी शिवसेना स्टाईलने दिले उत्तर, म्हणाले, संपलेल्या पक्षावर…
संगीत क्षेत्रातून आणखी एक दुःख बातमी; प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा याचं निधन