kolhapur guys in fifa world cup | आता सध्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप सुरु आहे. त्यामुळे जगभरात त्याचीच चर्चा सुरु आहे. कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप सुरु झाल्यापासून फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्येही हा वर्ल्डकप उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या चौकात रस्त्यांवर, गल्लीबोळात पोस्टर्स आणि कटआऊट्स लावण्यात आलेले आहे. अशात कोल्हापूरच्या काही तरुणांनी आपल्या तालमीचा झेंडा कतारच्या मैदानावर फडकवला होता. कोल्हापूर शहरातील असलेली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशचा झेंडा कतारमध्ये फडकवला होता.
आता काही तरुणांनी कतारमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पोस्टर्स झळकावले आहे. त्यांनी शाहू महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा जयघोष केला आहे. सध्या त्यांच्या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
कोल्हापूर शहरात माधुरी बेकरी खुप प्रसिद्ध आहे. या बेकरीचे मालक असलेल्या वडगावकर कुटुंबातील श्रीदत्त वडगावकर, प्रसन्न वडगावकर, प्रेम वडगावकर आणि अक्षय मोरे हे कतारमध्ये वर्ल्डकपचा सामना पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी साऱ्या दुनियेची शान म्हणत त्यांनी शिवशाहूंचा जयघोष केला आहे.
२५ नोव्हेंबरला ते कतारमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी आवडत्या संघाचा सामना पाहण्याचा आनंदही लुटला. अशात मैदानावर असताना ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पोस्टर्स झळकावताना दिसून आले आहे.
राज्यात कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरात किती फुटबॉलप्रेमी आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. पुढचा वर्ल्डकप कतारमध्ये होणार हे कोल्हापूरच्या तरुणांना माहिती होते. त्यांनी गेल्या चार वर्षांपासून पैसे वाचवण्यास, कतार जाताना लागणाऱ्या गोष्टींची सोय करुन ठेवली होती. अथक प्रयत्नानंतर त्यांना व्हिसाही मिळाला. त्यामुळे त्यांचे स्वप्न पुर्ण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मस्करी पडली महागात! मित्रांनी नको त्या ठिकाणी प्रेशरनं हवा भरली; धुळ्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
किल्ला चढताना दरीत कोसळून मृत्यू; म्हणायचा, मराठ्याची अवलाद आहे मरणाला घाबरत नाही..
गरिबीने पिचलेल्या व्यक्तीला समुद्रकिनारी सापडली 35 लाखांची अंगठी; कष्टाने मूळ मालक शोधत केली परत