Share

Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात सापडला १२ व्या शतकातील ‘खजिना’; उलगडणार अनेक रहस्ये

kolhapur

kolhapur amabai temple stone  | कोल्हापूरमधून एक हैराण कऱणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळला आहे. आता हा यादवकालीन शिलालेख फक्त कोल्हापूरातच नाही, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील भिंतीवरील संगमरवर काढण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर इसवी सनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळला आहे. मंदिरात आढळलेला हा शिलालेख संस्कृत आणि देवनागरी भाषेत आहे.

हा शिलालेख २ फुट लांब आणि एक फुट रुंद आहे. गद्धेकाळी प्रकारातील आणि दानपत्र स्वरुपाच्या या शिलालेखावर १६ ओळी कोरल्या असल्याचे समोर आले आहे. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर मूळ स्वरुपात यावे यासाठी संवर्धन प्रकल्प सुरु केला आहे. त्यामुळे मंदिरातील फरशी काढण्याचे काम सुरु आहे. त्यावेळी सरस्वती मंदिराच्य प्रदक्षिणा मार्गावरील फरशी काढताना हा शिलालेख आढळून आला आहे.

हा शिलालेख बाराव्या शतकातील असल्याची माहिती मंदिर सहाय्यक व्यवस्थापक आणि धर्मशास्त्र विभागाचे गणेश नेर्लेकर देसाई यांनी दिली आहे. तसेच शिलालेखाच्या भाषांतर पुर्ण झाल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाकडून आणखी माहिती देण्यात येईल, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

हा शिलालेख मूळ मंदिराचा भाग आहे. त्याचा वापर आडवा दगड म्हणून केला असावा. हा लेख शापाशिर्वादात्मक आणि दानपत्र स्वरुपात असण्याचीही शक्यता आहे, त्याबाबत त्याची तपासणीही केली जात आहे. या शिलालेखामुळे कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात सापडला १२ व्या शतकातील ‘खजिना’; उलगडणार अनेक रहस्ये
raju shetti : …तर मी विरोधकांसोबत जाणार, राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं, राजकीय समीकरण बदलणार
Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now