इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात क्वालिफायर-२ खेळला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी ७.३० पासून हा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणाऱ्या संघाची अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी (Gujarat Titans) गाठ पडेल.(Statement, Virat Kohli, Shoaib Akhtar)
या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आरसीबी स्टार विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीला यापेक्षा जास्त पडताना मी पाहू शकत नाही, असे त्याने म्हटले आहे. विराट कोहली कोण आहे हे त्याला आज जगाला दाखवून द्यावे लागेल, असेही अख्तर म्हणाला.
शोएब अख्तरने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘माझे मन मला सांगत आहे की आज विराट कोहली त्याचा खेळ दाखवून देईल. आज त्याला त्याच्या संघाला येथून पुढे न्यावे लागेल. मी त्यांना त्यापेक्षा जास्त पडताना पाहू शकत नाही. ही माझ्या मनाची इच्छा आहे. आजच्या सामन्यातही तेच पाहण्यासारखे असेल. त्याने मॅच विनिंग इनिंग खेळावे अशी माझी इच्छा आहे. मला त्यांना आनंदी बघायचे आहे.
अख्तर म्हणाला, कोहली महान खेळाडू आहे. लोक त्याला विनाकारण ट्रोल करत असतात. आज घाबरण्याची गरज नाही, त्यांना मैदानात जाऊन स्वतःला सिद्ध करायचे आहे आणि समोरच्या संघाला दाखवून द्यायचे आहे की, विराट कोहली कोण आहे. अशाप्रकारे पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराटला पाठींबा दिला आहे.
विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकही आज आरसीबीसाठी मैदानात उतरणार आहे. तो संघाचा सर्वोत्तम फिनिशर ठरला आहे. अशा परिस्थितीत अख्तर कार्तिकबद्दल म्हणाला, ‘दिनेश कार्तिकला मी खेळताना पाहिले आहे, खूप मजबूत खेळाडू आहे. शौर्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संघर्ष आले, त्यानंतरही तो पुनरागमन करत शानदार कामगिरी दाखवत आहे.
विराट कोहलीने या सीजनमध्ये आतापर्यंत १५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २३.८६ च्या सरासरीने केवळ ३३४ धावा केल्या आहेत. कोहलीला केवळ दोन अर्धशतके ठोकता आली आहेत. आयपीएल २०२२ च्या सीजनमध्ये कोहली तीनदा गोल्डन डकवर बाद झाला आहे. विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २२२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३६.३६ च्या सरासरीने ६६१७ धावा केल्या आहेत. यात त्याने ५ शतके आणि ४४ अर्धशतके झळकावली.
महत्वाच्या बातम्या-
प्लेऑफसाठी अजूनही ५ दावेदार, रोहित शर्मावर टिकलंय विराट कोहलीचं भवितव्य, जाणून घ्या कसं?
विराट कोहलीचे RCB च्या कॅप्टनवर गंभीर आरोप; म्हणाला, तो माझं ऐकत नाही…
VIDEO: अनुष्कासाठी गिफ्ट घेण्यासाठी या बेकरीत गेला होता विराट कोहली, कोणीच नाही ओळखलं
खराब फॉर्मवर विराट कोहलीने सोडलं मौन, टीका करणाऱ्यांना एकाच वाक्यात दिलं सडेतोड उत्तर