रजत पाटीदारने ( Rajat Patidar) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अतुलनीय शतक झळकावून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला आयपीएल-२०२२ च्या क्वालिफायर-२ मध्ये पोहचवल. त्याने ५४ चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ११२ धावांची खेळी केली. त्याच्या झंझावाती शतकाच्या जोरावर बेंगळुरूने ४ विकेट गमावत २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावांपर्यंत मजल मारू शकला.(Lucknow Super Giants, Rajat Patidar, Royal Challengers Bangalore)
या विजयाचे सर्वाधिक श्रेय रजतला जाते. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यानंतर याच टूर्नामेंटचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रजत पाटीदारला कोणी मिठीही मारत नाही. वास्तविक १९ मे रोजी बंगळुरू आणि गुजरात यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात बंगळुरूने गुजरातचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने ५४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७३ धावांची तुफानी खेळी केली.
डगआऊटमध्ये सामना संपल्यानंतर खेळाडू सेलिब्रेशनमध्ये होते. विराट कोहली मिठी मारून सर्वांचे अभिनंदन करत असताना रजत त्याच्या मागे उभा होता. त्याने अनेकवेळा हाय-फाइव्हसाठी हात वर केला, पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. यानंतर रजत टाळ्या वाजवू लागतो. आता तो सर्वांच्या नजरेत आल्यानंतर हा काही दिवसाचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी संतापले आहे.
https://twitter.com/crictalk7/status/1529686688808976384?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529686688808976384%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fiplt20%2Fnews%2Fipl-2022-rajat-patidar-embarrassing-moment-video-viral%2Farticleshow%2F91826480.cms
आयपीएल २०२२ चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बंगलोरला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तत्पूर्वी, शेवटच्या एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावणाऱ्या रजत पाटीदारच्या (५८ धावा) अर्धशतकी खेळीनंतरही आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाटीदारने सहाव्या षटकात जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत ४२ चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले.
कर्णधार फाफ डू प्लेसिसने २५ आणि ग्लेन मॅक्सवेलने (१३ चेंडू, दोन षटकार, एक चौकार) २४ धावांचे योगदान दिले. कृष्णाने पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध निराशाजनक गोलंदाजीतून पुनरागमन केले आणि विराट कोहली आणि दिनेश कार्तिकच्या विकेट्ससह तीन बळी घेतले. मॅकॉयनेही तीन बळी घेतले. ट्रेंट बोल्ट आणि आर अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या-
लग्नाची पुर्ण तयारी झाली, पाहुण्यांना आमंत्रण पाठवले तेवढ्यात रजत पाटीदारचा फोन वाजला अन्..
फोन वाजला अन् रजत पाटीदारने स्वत:च्या लग्नाची तयारी सोडून थेट गाठली IPL, वाचा भन्नाट किस्सा
भारत सोडून चालला होता, एक फोन आला, बँग भरली अन्.., वाचा RCB च्या रजत पाटीदारची कहाणी
जॉस द बॉसने RCB चे स्वप्न मिळवले धुळीस, शानदार शतक ठोकत RR ला नेले फायनलमध्ये