Kohinoor diamond: ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परंतु या दरम्यान ब्रिटनच्या राजघराण्याकडे असणाऱ्या मौल्यवान खजिन्याची चर्चा जोर धरत आहे. ब्रिटनकडून भारताला कोहिनूर हिरा परत करण्यात यावा, अशी मागणी मोठ्या प्रमाणात देशाच्या विविध भागांतून होत आहे.
वसाहतवाद फोफावला असताना ब्रिटनने ज्या खंडातील देशांवर राज्य केले. तिथून अनेक मौल्यवान वस्तू घेतल्या. आता त्याच वस्तू परत करण्याची मागणी त्या देशांकडून होत आहे. ब्रिटनच्या महाराणीच्या मुकुटावर असलेला जगातील सर्वात मौल्यवान कोहिनूर हिरा भारताचा आहे. त्याच हिऱ्याबाबत ओडिशा राज्यातील एका सामाजिक- सांस्कृतिक संघटनेने तो हिरा भगवान जगन्नाथाचा असल्याचा दावा केला आहे.
महाराणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात असलेला कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथाची संपत्ती आहे, असा दावा जगन्नाथ सेनेकडून करण्यात येत आहे. तो हिरा ऐतिहासिक पुरी मंदिराला परत करण्यात यावा. यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी जगन्नाथ सेना या संघटनेकडून केली जात आहे.
इतिहासकार अनिल धीर यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानच्या नादीर शहा विरूद्धच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर महाराज रणजीत सिंह यांनी कोहिनूर हिरा जगन्नाथ महाराज यांना दान केला. त्यानंतरच्या काळात तो हिरा ब्रिटिश राजवटीत रणजीत सिंह यांच्या उत्तराधिकाऱ्याने ब्रिटनच्या महाराणीला सुपूर्त केला.
परंतु तेव्हा ब्रिटनने भारताच्या अनेक प्रांतांवर कब्जा केला होता. त्यात पंजाबचाही समावेश होता. त्यामुळेच त्या परिस्थितीत रणजीत सिंह यांच्या उत्तराधिकाऱ्याला तो हिरा सुपूर्त करावा लागला. मात्र आता परिस्थिती ती नाही. वसाहतवादाचा काळ संपला. ब्रिटिशांचे राज्य असणाऱ्या देशांमध्ये आता लोकशाही नांदत आहे. त्यामुळे तेथून अनेकवेळा आपल्या मौल्यवान वस्तू परत करण्याची मागणी ब्रिटनच्या राजघराण्याकडे होत आहे.
भारताकडून कोहिनूर हिरा परत मिळण्यासाठी जशी मागणी होत आहे. त्याच प्रकारची मागणी दक्षिण आफ्रिकेकडून देखील होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या राजघराण्याकडून ब्रिटनच्या राजघराण्यात सद्या असलेल्या एका हिऱ्याला परत करण्याची मागणी होत आहे. ‘द ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका’ असे त्या मौल्यवान हिऱ्याचे नाव आहे.
महत्वाच्या बातम्या-
coins : १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॅंकेला युवकाने शिकवला चांगलाच धडा; वाचा नेमकं काय घडलं..
Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका ; १० लाखांचा दंडही ठोठावला, वाचा काय आहे नेमकं प्रकरण
BJP : जळगावात भाजपाच्या चारी मुंड्या चीत, गिरीश महाजनांना भोपळा, कुणी मारली बाजी?