बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती क्रिकेटर विराट कोहली हे सिनेसृष्टीतील आणि क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही नेहमी कपल गोल्स देताना दिसून येतात. तसेच सोशल मीडियाद्वारे दोघे नेहमी त्यांचे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसून येतात.
विराट आणि अनुष्काच्या प्रेमाची, त्यांच्यामधील बॉन्डिंगची नेहमीच सर्वत्र चर्चा होत असते. यादरम्यान विराटची एक जुनी मुलाखत सध्या माध्यमात चर्चेत आहे. या मुलाखतीत विराटने अनुष्कासोबतच्या त्याच्या लव्हलाईफबाबत सांगितले होते. तसेच अनुष्कासोबतचा त्याचा बॉन्ड जितका भावनिक आहे तितकाच तो मजबूत असल्याचेही विराटने म्हटले होते.
विराटच्या मते, अनुष्का त्याच्यासाठी खूप लकी आहे. कारण जेव्हा त्याला भारतीय संघाचे कर्णधार बनवण्याची बातमी मिळाली होती तेव्हा अनुष्का त्याच्यासोबत होती. विराटला मिळालेली ही आनंदाची बातमी ऐकून अनुष्का आणि तो दोघेही खूपच भावूक झाले होते. तसेच अनुष्कासमोर विराट ढसाढसा रडला होता.
विराटने म्हटले होते की, ‘मला आठवतंय जेव्हा मी मोहालीमध्ये होतो तेव्हा टेस्ट सीरीज चालू होता. त्याचवेळी मला मेलबर्नमध्ये भारतीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले होते. तेव्हा अनुष्का माझ्यासोबत होती. ही बातमी ऐकताच आम्ही दोघेही खूपच भावूक झालो होतो’.
दरम्यान, विराट आणि अनुष्काने २०१७ साली लग्नगाठ बांधली होती. इटलीमध्ये त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केले होते. तेथून भारतात परतल्यानंतर त्यांनी दिल्लीत रिसेप्शन दिले होते. या पार्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
विराट-अनुष्काच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून या दोघांच्या आयुष्यात २०२१ साली एका चिमुकलीचीही एंट्री झाली. ‘वामिका’ असे विरूष्काच्या मुलीचे नाव असून तिच्या येण्याने या दोघांच्या प्रेमात आणि आनंदात अधिकच भर पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
पुन्हा टॉलिवूडने बॉलिवूडला झोपवलं, KGF 2 ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ४ था चित्रपट
अनुष्का-विराटने शिकवलं खुल्लम खुल्ला प्रेम कसं करायचं, पहा व्हायरल झालेले १० रोमँटिक फोटो
शाहरूख खानला अमेरिकेच्या एअरपोर्टवर पुन्हा अडवले? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचे सत्य