Share

‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देणाऱ्या मुलीला सलमान-आमिरने दिले ३ कोटी रूपये? वाचा व्हायरल पोस्टमागचे सत्य

salman khan and aamir khan

सध्या देशभरात कर्नाटकमधील हिजाब वाद फारच चर्चेत आहे. नुकतीच मुस्कान नावाच्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ती मुलगी हिजाब घातलेली असून ‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा देताना दिसून आली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी मुस्कानचे कौतुक केले तर काही लोकांनी तिच्यावर टीकाही केली.

यादरम्यान सोशल मीडियावरील काही पोस्टसमध्ये असा दावा करण्यात आला की, मुस्कानला सलमान खान आणि आमिर खानने (salman khan and aamir khan) कोट्यवधी रूपये बक्षिस म्हणून दिले आहे. दूसरीकडे तुर्की सरकारने मुस्कानला बक्षीस देण्याचे घोषित केले. व्हायरल पोस्टमध्ये म्हणण्यात आले की, सलमान आणि आमिर खान या दोघांनी मिळून मुस्कान खानला ३ कोटी रूपये दिले आहेत. तर तुर्की सरकार तिला २ कोटी रुपये देणार आहे.

परंतु, KoiMoi च्या एका रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या एका संशोधनानुसार खोट्या असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सांगण्यात येत आहे की, तुर्की सरकारने मुस्कानला बक्षिस देणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. तसेच सलमान खान आणि आमिर खाननकडूनही मुस्कानला बक्षिस देण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याशिवाय या दोन्ही कलाकारांनी हिजाब वादावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका कॉलेजमध्ये हिजाब घातल्याने काही विद्यार्थीनींना वर्गात जाऊ देण्यात आले नाही. त्यानंतर या प्रकरणावरून मोठा वाद झाला. यावरून कॉलेजच्या बाहेरही प्रदर्शन झाला होता. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये मुस्कान नावाची मुलगी हिजाब घालून कॉलेजमध्ये येताना दिसून आली होती. त्यानंतर तिच्या मागे काही मुलांचा जमाव येत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. तेव्हा मुस्काननेही ‘अल्लाह हु अकबर’च्या घोषणा देत मुलांना उत्तर दिले.

कर्नाटकमधील या वादाचे प्रतिसाद संपूर्ण देशभर उमटले. अनेक स्तरांतून या घटनेवर टीका करण्यात आली. सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळींनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. काही कलाकार शाळा, कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास विरोध दर्शवत आहेत. तर काहीजण हिजाब घालण्यास पाठिंबा देत आहेत. आतापर्यंत या प्रकरणावर जावेद अख्तर, कंगना राणावत, सोनम कपूर, स्वरा भास्कर या सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड लेखक जावेद अख्तर यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘मी कधीही हिजाब किंवा बुरखाच्या बाजूने नव्हतो. मी आताही या गोष्टीवर ठाम आहे. पण मुलींच्या छोट्या गटाला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांच्या जमावाचा मी निषेध करतो. हीच त्यांची पुरुषत्व दाखवण्याची पद्धत आहे का? ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या सेटवरून समोर आला नवा फोटो; एकमेकांच्या नजरेत हरवलेले दिसून आले रणबीर-आलिया
‘क्या से क्या हो गये देखते देखते’ म्हणत रितेश-जेनेलियाने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शेअर केला व्हिडिओ
दीपिकाच्या ‘गेहराइयां’ चित्रपटावर रणवीर सिंहने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, मला तुझा..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now