सध्या सोशल मीडियावर एक स्टारकिड खूप चर्चेत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांचे या स्टारकिड्ससोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडिओंना नेटकऱ्यांचीही खूप पसंती मिळत आहे. तर ही प्रसिद्ध स्टारकिड म्हणजे होस्ट जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विजची लाडकी मुलगी तारा भानुशाली (Tara Bhanushali) होय.
नुकतंच ताराचा अभिनेत्री सोनाली बिंद्रे आणि कियारा अडवाणीसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ शोच्या सेटवरील आहे. जय भानुशाली हा शो होस्ट करत आहे. तर या शोच्या एका एपिसोडमध्ये जयची मुलगी तारा दिसून आली होती. यावेळी सोनाली बिंद्रेने तारासोबत फोटो काढले.
तसेच अभिनेत्री कियारा आडवाणी या शोमध्ये तिच्या ‘भूल भूलैया २’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. तर कियारानेसुद्धा यावेळी तारासोबत वेळ घालवला. तसेच तिच्यासोबत अनेक फोटो काढले. त्यांचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले होते.
याशिवाय तारा तिच्या आई-वडिलांसोबत बाबा सिद्दीकींच्या पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीत दबंग स्टार सलमान खानसुद्धा पोहोचला होता. यादरम्यान पार्टीत सलमान खान तारासोबत खूप मजामस्ती करताना दिसून आला. पार्टीदरम्यानचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल झाला.
जयने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला होता. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘माझ्या मुलीचे काही अमूल्य क्षण जे ती तिच्या आयुष्यभर जपेल’. जयच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत त्याच्या मुलीच्या क्यूटनेसचे कौतुक केले.
तारा ही प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर तिचे २ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ताराचा इन्स्टाग्राम हँडल तिचे आई-वडिल माही आणि जय भानुशाली सांभाळत असतात.
महत्त्वाच्या बातम्या :
बलात्कारांच्या आरोपांवर अभिनेता विजय बाबूचा पलटवार; म्हणाला मीच पीडित, पुरावे सुद्धा आहेत…
अभिनेता विजय बाबूवर महिलेने केला बलात्काराचा आरोप; गुंगीच्या गोळ्या देऊन…
हिंदीची तळी उचलणाऱ्या अजय देवगनची बोलती बंद; साऊथच्या अभिनेत्याने असे झापले की…