अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि रवीन टंडन अभिनित ‘मोहरा’ हा चित्रपट १९९४ सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील सर्व गाणीसुद्धा (Mohra Movie Song) खूपच हिट झाले होते. यामध्ये ‘ना कजरे की धार..’ या गाण्यानेही खूप लोकप्रियता मिळवली होती. नव्वदच्या दशकातील हे गाणं आजही अनेकांच्या आवडीचे आहे. तर या रोमँटिक गाण्यात सुनील शेट्टीसोबत एक अभिनेत्री दिसली होती. ही अभिनेत्री म्हणजे पूनम झावर(Poonam Jhawar).
‘मोहरा’ या चित्रपटात पूनमने प्रिया अग्निहोत्री ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील ‘ना कजरे की धार..’ या गाण्यामुळे पूनम झावरला अमाप लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटानंतर तिने इतरही काही चित्रपटात काम केले. पण तिची ओळख ‘मोहरा’ चित्रपटातील या गाण्यापुरतेच मर्यादित राहिले. तर एवढी लोकप्रियता मिळवणारी ही अभिनेत्री आता काय करत असेल, जाणून घेऊया.
पूनम झावरचे कुटुंबीय मुळचे राजस्थानचे. पण नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. पूनमचे शिक्षणही मुंबईतच झाले. तिची आई हिंदी कवयित्री होत्या. आईचा साहित्य क्षेत्रात रस होता तर पुनमने मॉडेलिंग क्षेत्र आपले करिअर म्हणून निवडले. अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात करण्याअगोदर पूनमने अनेक ब्रँडच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग केले. यादरम्यान गुलशन राय यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला ‘मोहरा’ या चित्रपटाची ऑफर दिली.
‘मोहरा’ या चित्रपटात पूनमची भूमिका खूपच लहान होती. परंतु, ‘ना कजरे की धार..’ या गाण्याद्वारे पूनमने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. धुक्यांच्या ढगांमधून साडी नेसून चालत येणारी पूनम आजही लोकांच्या आठवणीत कायम आहे. या गाण्यामुळे पूनम एका रात्रीत स्टार झाली असली तरी तिला याचा काही फायदा झाला नाही.
https://youtu.be/Nos4hpVticE
‘मोहरा’नंतर पूनमने ‘दीवाना हू मैं तेरा’, ‘जियाला’ यासारख्या चित्रपटात काम केले. पण हे चित्रपट काही हिट झाले नाही. अभिनयात यश मिळत नसल्याने पूनम निर्मिती क्षेत्राकडे वळाली. तिने ‘आंच’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये ती स्वतः एक मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली. पण बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही.
‘आंच’ या चित्रपटाद्वारेच पूनमने तिच्या सिंगिंग करिअरचीसुद्धा सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने ‘सुन मेरी नानी’ हे गाणं गायलं होतं. त्यानंतर तिने ‘पू 4 यू’, ‘टेक मी होम बेबी’ आणि ‘पू क्या जलवा’ हे तिचे स्वतःचे तीन अल्बम काढले. याशिवाय तिने नऊ म्यूझिक व्हिडिओमध्येसुद्धा काम केले.
पूनम दीर्घकाळानंतर २०१२ साली एका चित्रपटात दिसली. हा चित्रपट होता अक्षय कुमार आणि परेश रावलचा बहुचर्चित चित्रपट ‘ओह माय गॉड’. या चित्रपटात पूनमने गोपी मैया नावाच्या एका साध्वीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना हीच ती ‘ना कजरे की धार..’ गाण्यातील अभिनेत्री आहे, यावर विश्वास बसला नाही. ‘ओह माय गॉड’ नंतर पूनम २०१३ साली आलेल्या ‘आर राजकुमार’ या चित्रपटात दिसली होती.
‘मोहरा’ या चित्रपटात साधी सोज्वळ भूमिका साकारणारी पूनम आता खूपच ग्लॅमरस झाली आहे. सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात येणाऱ्या तिच्या फोटोंद्वारे याची प्रचिती येते. पूनम इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. याद्वारे ती तिचे अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
‘आपकी इज्जत एक बार गई तो गई, हम तो रोज रातको बेचतेही है, खतम ही नही होती’
किरण माने यांनी ५ कोटींची नुकसानभरपाई मागत केले गंभीर आरोप; म्हणाले, मी सूत्रसंचालक म्हणून..
रश्मिका झाली oops moment ची शिकार, पाय वर करताच दिसले असे काही की.., पहा फोटो