झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते (Anita Date). मालिकेतील राधिका या भूमिकेद्वारे तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. एक सामान्य गृहिणीपासून ते मोठी उद्योजिका होण्यापर्यंतचा खडतर प्रवास अनिताने उत्तमरित्या सादर केला. आपल्या अभिनयाद्वारे तिने तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी अनिता राधिकाच्या रूपात अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिच्यासंदर्भात प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर आज या लेखाद्वारे राधिकाच्या अर्थात अनिता दातेच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याविषयी जाणून घेऊया.
अनिता दातेने अभिनेता आणि लेखक असलेल्या चिन्मय केळकरसोबत लग्न केले. चिन्मयने अनेक नाटकांमध्ये काम केले असून तोसुद्धा कलासृष्टीशी निगडीत आहे. तसेच त्याला फोटोग्राफीचीही फार आवड आहे. दोघांनी प्रेमविवाह केला असून त्यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. लग्नापूर्वी ते दोघे दीड वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिले होते.
अनिता आणि चिन्मय दोघे पुण्यातील ललित कला केंद्र येथे एकत्र शिकत होते. मात्र, यादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले नाही. तर एका नाटकादरम्यान त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. अनिता आणि चिन्मय ‘सिगारेट्स’ या नाटकात एकत्र काम करत होते. या नाटकाच्या तालमीसाठी ते अनेकवेळा भेटत असत.
पण नाटकाच्या तालमीनंतर दोघे एकमेकांना मिस करू लागले. त्यानंतर दोघांनीही एके दिवशी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर दीड वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरही ते दोघे नवरा-बायको कमी तर एकमेकांचे मित्र-मैत्रीण म्हणूनच जास्त राहत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते.
दरम्यान, अनिताने ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दार उघडं ना गडे’, ‘अग्निहोत्र’, ‘मंथन’, ‘अनामिका’ यासारख्या मालिकांद्वारेही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. लवकरच अनिता ‘मी वसंतराव’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
भाजपच्या विजयाने बॉलिवूडच्या तिन्ही खानला होणार ‘हे’ नुकसान, प्रसिद्ध अभिनेत्याची अजब भविष्यवाणी
‘ना लग्न, ना मुले, ना सत्तेचे भोगी, ज्यांना पाहून घाबरतात गुंड, तेच आहेत युपीचे योगी’; कंगनाच्या हटके शुभेच्छा
‘झुंड’ला मिळालेली ‘एवढी’ जबरदस्त रेटिंग पाहून अमिताभ बच्चनही झाले शॉक, म्हणाले, हे खूपच…