Share

कुणी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी झाली होती धनुष आणि रजनीकांतच्या मुलीची पहिली भेट; वाचा कसे पडले एकमेकाच्या प्रेमात

दाक्षिणात्य अभिनेता धनुषने सोमवारी एक ट्विट करत पत्नी ऐश्वर्यासोबत विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. त्याच्या या ट्विटने सर्वांनाचा धक्का बसला. धनुष आणि ऐश्वर्याने तब्बल १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या घटस्फोटामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. आज धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाबाबत खूप चर्चा सुरु असली तरी एकेकाळी ते दोघे आदर्श कपल म्हणून ओळखले जात होते. या दोघांची लव्हस्टोरीसुद्धा खूपच रंजक आहे.

धनुष हा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते कस्तूरी राजा यांचा मुलगा आहे. तर ऐश्वर्या सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी. या दोघांची पहिली भेट एका चित्रपटगृहात झाली होती. धनुष त्याचा ‘कढाल कोन्डैन’ हा चित्रपट पाहण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांसोबत सिनेमागृहात गेला होता. तिथे रजनीकांत यांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्याही उपस्थित होत्या.

तिथे सिनेमागृह मालकाने ऐश्वर्या आणि सौंदर्याची भेट धनुषशी करून दिली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने धनुषसाठी घरी पुष्पगुच्छ पाठवला आणि त्यासोबत एक चिठ्ठी पाठवली, ज्यावर लिहिले होते, ‘गुड वर्क, संपर्कात राहा’. यासोबतच ऐश्वर्या धनुषच्या बहिणीलाही ओळखत होती आणि दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे ती अनेकदा धनुषलाही भेटत असे.

त्यानंतर काही काळाने ऐश्वर्या आणि धनुषच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या. या अफवांमुळे दोघांचेही कुटुंबीय थोडेसे नाराजही झाले होते. पण नंतर त्यांनी विचार केला की, ऐश्वर्या आणि धनुष चांगले जीवनसाथी बनू शकतात. त्यानंतर ऐश्वर्या आणि धनुषनेही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार दोघांचे १८ नोव्हेंबर २००४ रोजी तमिळ पद्धतीनुसार लग्न झाले. रजनीकांत यांच्या घरी हे लग्न पार पडले. रजनीकांत यांनी आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात केले होते. या लग्नानंतर ग्रँड रिसेप्शनही देण्यात आले होते. लग्नावेळी धनुष फक्त २१ वर्षांचा आणि ऐश्वर्या २३ वर्षांची होती.

दरम्यान, धनुष आणि ऐश्वर्याने विभक्त होण्याबाबत सांगताना लिहिले की, ‘अनेक वर्षे एकत्र मित्र म्हणून, जोडपे म्हणून आणि आई-वडील म्हणून, एकमेकांचे शुभचिंतक म्हणून प्रवास केला, एकमेकांना समजून घेतलं, अॅडॉप्ट केलं. आज आम्ही जिथे उभे आहोत तिथून आमचे रस्ते वेगळे होत आहेत’.

‘ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, आम्हाला समजायला वेळ लागला की आम्ही वेगवेगळेच ठीक आहोत. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि तो हाताळताना आम्हाला प्रायवसी द्या’.

https://twitter.com/dhanushkraja/status/1483128992312225792?s=20

महत्त्वाच्या बातम्या : 

‘पावनखिंड’चा थरार पाहायला व्हा तयार; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
रिअ‍ॅलिटी शोमध्ये मुलांनी उडवली मोदींची खिल्ली; सरकारने मीडिया हाऊसविरोधात उचलले टोकाचे पाऊल

आलियाने स्वत:च उघड केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘ही’ आहे माझी फेव्हरेट सेक्स पोझीशन

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now