बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजकुमार (Raj Kumar) त्यांच्या चित्रपटांसोबत आपल्या दमदार डायलॉग डिलिव्हिरीसाठीही ओळखले जात होते. राजकुमार यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले. ते त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असत. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. तर आज राजकुमार यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही माहिती जाणून घेऊया.
राजकुमार यांचे खरे नाव कुलभूषण जाधव असे आहे. पाकिस्तानमधील एका काश्मीरी पंडिताच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते मुंबईत सब-इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते. त्यांच्या पोलीस ठाण्यासमोर समीर शेख नावाचे व्यक्ती राहायचे. त्यांच्या भावाची फिल्म इंडस्ट्रीतल्या काही लोकांशी ओळख होती. समीर आणि राजकुमार यांची चांगली मैत्री होती.
एके दिवशी समीर यांनी राजकुमार यांचे काही फोटो त्यांच्या ओळखीच्या काही दिग्दर्शकांना दिले आणि काही दिवसांनी दिग्दर्शक नज्म नख्वी यांनी राजकुमार यांची भेट घेऊन त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी तयार केले. त्यानुसार राजकुमार यांनी १९५२ साली आलेल्या ‘रंगीली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
https://www.instagram.com/p/CSbhSK9skX4/
त्यानंतर त्यांनी ‘घमंड’, ‘लाखों में एक’, ‘मदर इंडिया’, ‘पैगाम’, ‘वक्त’, ‘दिल एक मंदिर’, ‘हमराज’, ‘पाकिजा’, ‘हिर रांझा’, ‘लाल पत्थर’, ‘सौदागर’, ‘तिरंगा’ अशा अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर ते ८० च्या दशकात सहाय्यक अभिनेता म्हणून अनेक चित्रपटात काम केले. यामध्ये ‘कुदरत’, ‘एक नई पहेली’, ‘मरते दम तक’, ‘मुक्कदर का फैसला’, ‘जंगबाज’, ‘गॉड अॅन्ड गन’ अशा चित्रपटांचा समावेश आहे.
राजकुमार यांचा सिनेसृष्टीतील प्रवास योग्य मार्गावर सुरु असताना त्यांची भेट जेनिफर यांच्याशी झाली. विमानात त्यांची भेट झाली होती. जेनिफिर तिथे फ्लाईट अटेंडेट म्हणून काम करत होत्या. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर जेनिफिर यांनी आपले नाव बदलून गायत्री असे करून घेतले.
https://www.instagram.com/p/CJZ2um5BQMG/
राजकुमार यांच्याविषयी सांगण्यात येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. राजकुमार यांना घशाचा कर्करोग झाला होता. दीर्घकाळ राजकुमार या आजाराशी त्रस्त होते. यामुळे त्यांना काही खातापिता येत नव्हते. तसेच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता.
या आजारामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. रिपोर्टनुसार, राजकुमार यांना त्यांच्या आजाराबाबत कोणाला कळू नये, अशी इच्छा होती. राजकुमार यांना स्वतःलाही त्यांच्या मृत्यूची चाहूल काही तास आधीच लागली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांना त्यांची शेवटची इच्छा सांगितली.
राजकुमार यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितले होते की, ‘माझ्या मृत्यूची बातमी माझ्यावर अंतिम संस्कार झाल्यावरच सगळ्यांना सांगा. मृत्यूनंतर मला जाळून टाका, पण माझ्या मृत्यूबद्दल कोणालाही माहिती देऊ नका’. त्यामुळे राजकुमार यांच्या या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्यावर गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या :
आई कुठे काय करते’फेम अरुंधतीने अनोख्या पद्धतीने साजरा केला मुलीचा वाढदिवस; चाहते म्हणाले, वाह…
राखी सावंतचा ‘हा’ व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल
‘मी चित्रपट पाहिला नाही पण..,’ ‘द काश्मीर फाइल्स’वर नाना पाटेकरांचं मोठं विधान