गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने देशात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. संगीत क्षेत्रातील गानसरस्वती गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. यादरम्यान लता मंगेशकर यांच्या जीवनासंबंधित अनेक गोष्टी माध्यमात चर्चेत आहे. तर लता मंगेशकर यांची पहिली कमाई किती होती आणि त्यांची एकूण संपत्ती किती(Lata Mangeshkar Net Worth) होती, याबाबत जाणून घेऊया.
लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी आपल्या गायनाला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या दीर्घकालीन करिअरमध्ये ३६ भाषांमध्ये ३० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्यांची पहिली कमाई केवळ २५ रूपये होती. परंतु, पुढे जाऊन आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि कौशल्याच्या आधारावर त्यांनी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली.
रिपोर्टनुसार लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती ३७० कोटी रूपये होती. त्यांची अधिकतर कमाई त्यांच्या गाण्यांद्वारेच त्यांना मिळाली आहे. याशिवाय त्यांनी चांगल्या प्रकारे गुंतवणूकही केली होती. त्या मुंबईच्या पेडर रोड या एरियातील प्रभुकुंज भवन येथे राहत होत्या. लतादीदी यांची लाईफस्टाईल खूपच साधी होती. संगीताशिवाय लतादीदी यांना कार्स आणि क्रिकेटचीसुद्धा आवड होती.
रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे अनेक कार्सचे कलेक्शन होते. याबाबत खूप वर्षापूर्वी एका मुलाखतीत बोलताना लतादीदी यांनी म्हटले होते की, त्यांनी सर्वात अगोदर एक Chevrolet खरेदी केली होती. ही कार त्यांनी इंदोरमध्ये त्यांच्या आईच्या नावे खरेदी केली होती. त्यानंतर त्यांच्याकडे Buick कार आली. याशिवाय त्यांच्याकडे Chrysler ही कारसुद्धा होती.
एवढेच नाही तर एकदा यश चोप्रा यांनीसुद्धा लतादीदी यांना एक कार भेट म्हणून दिली होती. यासंदर्भात एक मुलाखतीत बोलताना लता यांनी म्हटले होते की, ‘यश चोप्रा हे मला बहिण मानत असत. वीरजारा या चित्रपटाच्या म्यूझिक लाँचदरम्यान त्यांनी मला एका मर्सिडीज कारची चावी आणून माझ्या हातात ठेवली होती. आणि त्यांनी मला सांगितले की, ते मला कार भेट म्हणून देत आहेत. माझ्याकडे आतासुद्धा ती कार आहे’.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर काल सांयकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी असंख्य जनसागर लोटला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवाजी पार्क येथे पोहोचून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली होती. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबीयांसोबत, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिग्गज नेते शरद पवार, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, अभिनेता शाहरूख खान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असे अनेक दिग्गज मंडळीही यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी साश्रू नयनांनी लता मंगेशकर यांना निरोप दिला.
महत्त्वाच्या बातम्या :
अभिनेता शाहरुख खान अंत्यदर्शनावेळी लता मंगेशकर यांच्यावर थुकला? काय आहे नेमकं सत्य जाणून घ्या…
14 कोटी फॉलोअर्स असणाऱ्या लता मंगेशकर केवळ ‘या’ नऊ जणांना करत होत्या फॉलो
लता मंगेशकर यांची प्रकृती पुर्णपणे ठिक झाली होती, पण…; डॉक्टरांनी सांगितले लतादिदींच्या मृत्युचे खरे कारण