Share

‘KGF’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता एकेकाळी होता यशचा बॉडीगार्ड, वाचा रंजक कथा

KGF Garuda

दाक्षिणात्य अभिनेता यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ (KGF) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत असून यशच्या अभिनयाचे कौतुक करण्यात येत आहे. यशसोबत चित्रपटातील संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज, राव रमेश या कलाकारांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

यादरम्यान ‘केजीएफ’ चित्रपटात गरूडा या खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सध्या माध्यमात चर्चेत आहे. ‘केजीएफ चॅप्टर १’ मध्ये प्रेक्षकांना गरूडाची भूमिका पाहायला मिळाली होती. त्यानंतर ‘केजीएफ चॅप्टर २’ (KGF 2) मध्येसुद्धा हे पात्र दिसून आले होते. तर ‘केजीएफ’मध्ये गरूडा हे पात्र साकारणारा अभिनेता कोण? त्याबद्दल जाणून घेऊया.

प्रशांत नील यांच्या ‘केजीएफ’ या चित्रपटात क्रूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या गरूडाचे खरे नाव रामचंद्र राजू असे आहे. त्याने ‘केजीएफ चॅप्टर १’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने अनेक तमिळ आणि तेलूगू चित्रपटात काम केले.

https://www.instagram.com/p/Bg9ClMxAeel/?utm_source=ig_web_copy_link

‘केजीएफ’ मध्ये गरूडा अर्थात रामचंद्र राजू यशच्या विरोधात असतो. परंतु, खऱ्या आयुष्यात तो यशचा चांगला मित्र आहे. सुरुवातीला रामचंद्र राजू यशचा बॉडीगार्ड म्हणून काम करत असे. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. यशचा बॉडीगार्ड म्हणून काम करणारा रामचंद्र राजू नंतर चित्रपटात खतरनाक खलनायक बनला.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्याला व्यक्तीला अभिनेत्याची भूमिका कशी मिळाली? तर त्याचे उत्तर असे की, जेव्हा प्रशांत नील ‘केजीएफ’ चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी यशजवळ गेले होते तेव्हा तिथे बॉडीगार्ड रामचंद्र राजू उपस्थित होता.

त्यावेळी प्रशांत नील यांची नजर रामचंद्र राजूवर पडली. रामचंद्र राजूला पाहताच प्रशांत नील यांना त्याचा लूक इतका आवडला की त्यांनी लगेचच त्याला केजीएफमधील खलनायकाची भूमिका ऑफर केली. त्यानुसार बॉडीगार्ड रामचंद्र राजू ‘केजीएफ’मधील खलनायक गरूडा बनला.

‘केजीएफ १’ मध्ये रॉकीभाई अर्थात यश गरूडाला ठार मारतो. तर ‘केजीएफ २’ मध्ये गरूडाचा भाऊ अधीरा म्हणून संजय दत्तची एंट्री होते. परंतु, ‘केजीएफ २’ चित्रपटात फ्लॅशबॅकमध्ये गरूडाची कथा दाखवण्यात येत. अशात ‘केजीएफ २’ मध्येसुद्धा गरूडा हे पात्र दिसून येते.

KGF 2

दरम्यान, ‘केजीएफ’मधील गरूडा या पात्रामुळे रामचंद्र राजू एका रात्रीत स्टार झाला. या चित्रपटामुळे त्याला लोकप्रियता मिळण्यासोबतच अनेक चित्रपटांचे ऑफरही मिळण्यास सुरुवात झाली. सध्या त्याच्या हातात तेलुगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम अशा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांचे ऑफर्स आहेत.

रामचंद्र राजू अभिनेता पवन कल्याण आणि राणा दग्गुबाती अभिनित ‘भीमला नायक’ या चित्रपटातही दिसून आला होता. याशिवाय रश्मिका मंदाना आणि कार्ति मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सुल्तान’ या चित्रपटाद्वारे त्याने तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केले. सध्या तो ‘जन गन मन’ या तमिळ आणि ‘स्तंभम २’ या मल्याळम चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
..त्यावेळी मी स्टुडिओमध्ये उलटी साफ करायचे, रवीना टंडनचा वैयक्तिक आयु्ष्याबद्दल मोठा खुलासा
‘या’ अभिनेत्रीला स्वत:पेक्षा हुशार आणि सुंदर समजते रेखा, म्हणाली, ‘तिने सगळ्यांना वेड लावले होते’
चिन्मय मांडलेकरने प्रेक्षकांना केली कळकळीची विनंती; म्हणाला, चित्रपट पाहत असताना चित्रपटाचा शेवट..

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now