बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्र्या ((Bollywood Actress) आहेत ज्यांनी अल्पावधीतच सिनेसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली. परंतु, काही काळ इंडस्ट्रीत घालवल्यानंतर या अभिनेत्रींनी बॉलिवूडला रामराम ठोकला. यामध्ये काहींनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे तर काहींनी इतर कारणांमुळे सिनेसृष्टीपासून लांब गेले. यामध्ये ममता कुलकर्णी, प्रिया गिल, फरहीन, किमी काटकर, आयशा जुल्का अशा काही अभिनेत्रींची नावे घेता येईल. तर या यादीतीलच आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिरोडकर.
शिल्पा शिरोडकर ही ९० च्या दशकातील बोल्ड आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. शिल्पाने तिच्या सिनेसृष्टीतील १० वर्षाच्या कारकिर्दीत गोविंदा, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, मिथुन चक्रवर्ती अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. परंतु, तिला इंडस्ट्रीत हवे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर ती इंडस्ट्रीमधून गायब झाली. तर अभिनयापासून दूर गेल्यानंतर शिल्पा कुठे गेली आणि सध्या ती काय करते? याबद्दल जाणून घेऊया.
शिल्पाने रमेश सिप्पी यांच्या १९८९ साली आलेल्या ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. परंतु त्यानंतर आलेल्या ‘किशन कन्हैया’ या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. या चित्रपटामुळे शिल्पाला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने ‘आँखे’, ‘गोपी किशन’, ‘बेवफा सनम’, ‘रघुवीर’ अशा चित्रपटातही काम केले. १९९३ साली आलेल्या ‘आँखे’ चित्रपटातील शिल्पाची चंद्रमुखी ही भूमिका विशेष गाजली होती.
शिल्पाने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले होते. परंतु, २००० साली शिल्पाने अचानक बॉलिवूडला रामराम करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. काही रिपोर्टनुसार, शिल्पाला सिनेसृष्टीत हवे तसे यश मिळत नव्हते. त्यामुळे तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.
दुसरीकडे काही रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, तिने २००० साली ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या बँकर अपरेश रंजितसोबत लग्न केले. लग्नानंतर ती तिचा पूर्ण वेळ कुटुंबीयांना देऊ इच्छित होती. त्यामुळे ती इंडस्ट्रीपासून दूर गेली. लग्नाच्या तीन वर्षानंतर शिल्पाने २००३ साली मुलगी अनुष्काला जन्म दिला. आज शिल्पा तिच्या कुटुंबीयांसोबत भारताबाहेर दुबईमध्ये आनंदाने राहत आहे.
शिल्पा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. याद्वारे ती तिचे, कुटुंबीयांसोबते अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. तर या फोटोमध्ये दिसणाऱ्या शिल्पाला आता ओळखणे कठिण झाले आहे. एकेकाळी आपल्या सौंदर्यासाठी, बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असणारी शिल्पा आता खूपच बदलली आहे. लग्नानंतर तिच्या लूकमध्ये खूपच बदल झाल्याचे या फोटोंद्वारे लक्षात येते.
महत्त्वाच्या बातम्या :
माझी पत्नी माझं खुप रक्त पिते, काही उपाय असेल तर सांग भाऊ, सोनू सूदने दिले मजेशीर उत्तर, म्हणाला..
धोनीमुळे मला प्रेरणा मिळते कारण..; KGF फेम यशच्या वक्तव्याचं होतंय कौतुक, मानतो धोनीला आदर्श
‘माझं गाणं संपलं अन् पप्पांच्या डोळ्यात पाणी आलं’, आनंद शिंदेंच्या नातवाने सांगितला भावूक किस्सा