स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत अनिरूद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारे मिलिंद गवळी याद्वारे अनेक पोस्ट शेअर करत नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांच्या मुलीचा (milind gawali daughter) लग्नाचा वाढदिवस पार पडला. यानिमित्ताने मिलिंद यांनी एक खास पोस्ट शेअर करत मुलगी आणि जावयाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मिलिंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी मुलगी आणि जावयाच्या फोटोंच्या कोलाजचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘दिग्विजय मिथिला, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलांनो. दोघांना खूप प्रेम आणि आशीर्वाद. तुम्हा दोघांची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवो. नेहमी आनंदी आणि निरोगी राहा. खूप खूप प्रेम’.
मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर ऑनस्क्रीन मुलगी ईशा अर्थात अभिनेत्री अपूर्वा गोरेने कमेंट करत मिथिला आणि दिग्विजय यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच मिलिंद यांच्या अनेक चाहत्यांनीही त्यांच्या या पोस्टला पसंती दर्शवत मिथिला-दिग्विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मिलिंद गवळी यांची मुलगी मिथिला ही एक फिटनेस ट्रेनर आहे. thebalancedmith नावाच्या तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर ती नेहमी तिच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओ शेअर करताना दिसून येते. याशिवाय ती एक उत्तम डान्सर असल्याचेही तिने शेअर केलेल्या पोस्टद्वारे लक्षात येते.
https://www.instagram.com/p/CYzGPECjkLj/
दरम्यान, मिलिंद गवळी यांनी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. मिलिंद यांनी बालकलाकाराच्या रूपात सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर पुढे त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहेत. मराठीत त्यांनी ‘आम्ही का तिसरे’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘ढोलकीच्या तालावर’, ‘वैभवलक्ष्मी’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘सून लाडकी सासरची’, ‘सासर माझे मंदिर’, ‘सासूच्या घरात’ अशा चित्रपटात काम केले आहेत.
मराठीसोबत हिंदीतही त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम करत तिथे आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला आहे. हिंदीत त्यांनी ‘वक्त से पहले’, ‘चंचल’, ‘वर्तमान’, ‘अनुमती’, ‘हो सकता है’ अशा चित्रपटात काम केले आहेत. सध्या ते ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
रवि तेजाच्या चित्रपटाने रिलीजच्या आधीच घातला धुमाकूळ, प्री-बुकींगमध्ये कमावला बक्कळ पैसा
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…