kl Rahul : दोन अर्धशतकानंतर लगेचच अहंकारी झाला केएल राहूल? केले ‘हे’ हैराण करणारे वक्तव्य

kl rahul shocking statemen after fifty  | ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुपर १२ टप्प्यातील शेवटचा सामना ६ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे टीम इंडियाने निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून १८६ धावा केल्या आणि झिम्बाब्वेला १८७ धावांचे लक्ष्य दिले. त्याचवेळी केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी ही एकूण धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने बांगलादेशपाठोपाठ झिम्बाब्वेविरुद्धही अर्धशतक झळकावले. त्यानंतर आता केएलने मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुलने झिम्बाब्वेविरुद्ध सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने १४५.७१ च्या स्ट्राईक रेटने ३५ चेंडूत ५१ धावा केल्या. ज्यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारही होते. या शानदार खेळीनंतर त्याने स्वतःच्या फॉर्मबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

राहूल म्हणाला की, मी वर्ल्डकपध्ये खेळेल यावर माझा आत्मविश्वास होता. मी काही चांगल्या खेळी खेळल्या, अगदी सराव सामन्यांमध्येही चांगली खेळी खेळत होतो. त्यामुळे पहिल्या २-३ सामन्यामध्ये मी खेळलो नाही, तर त्यामुळे मी काही स्वत:वर शंका घेतली नाही.

केएल राहुल पुढे बोलताना म्हणाला की, एकदा तुम्हाला चांगली सुरुवात करता की, त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करणे महत्त्वाचे असते. तसेच, त्याने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची ही खेळपट्टी फलंदाजीसाठी आतापर्यंतची सर्वोत्तम विकेट असल्याचे वर्णन केले आहे.

केएल राहुल म्हणाले की, एकदा तुम्ही चांगली सुरुवात केली की, मोठा स्कोर उभा करणे गरजेचे असते. मेलबर्नची खेळपट्टी चांगली आहे. आम्ही आतापर्यंत फलंदाजी केलेल्या सर्वोत्तम फलंदाजी खेळपट्ट्यांपैकी ती एक होती. आम्ही चांगली कामगिरी केली. त्यामुळे आम्हाला एवढी धावसंख्या उभारता आली.

महत्वाच्या बातम्या-
Rohit Sharma : झिम्ब्बाब्वेविरुद्धही लवकर बाद झाल्यामुळे रोहित ट्रोल; संतप्त चाहते म्हणाले, थोडी तरी लाज वाटू दे…
Pakistan : अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव, ५ विकेट्सने सामना जिंकत पाकिस्तान सेमी फायनलमध्ये
India : नेदरलँड्सने केला आफ्रिकेचा पराभव अन् भारतालाच झाला फायदा, थेट कापलं सेमी फायनलचं तिकीट