kl rahul nervous after fifty | टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये सर्व भारतीय चाहत्यांच्या नजरा केएल राहुलवर आहेत, सलामीवीर म्हणून तो भारताला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पण गेल्या काही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरताना दिसत होता. अशात बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.
या सामन्यात टीम इंडियाला ५ धावांनी विजय मिळाला असून महत्त्वाचे २ गुण मिळाले आहेत. या सामन्यात केएल राहुलनेही ५० धावांची खेळी खेळून योगदान दिले आहे. बऱ्याच दिवसांपासून मोठ्या खेळीच्या शोधात असलेला केएल राहूल मात्र या खेळीनंतर एवढा खुश दिसला नाही.
केएल राहुल आतापर्यंत टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये खराबपणे फ्लॉप झाला होता, त्याने पाकिस्तान, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ३ सामन्यांमध्ये अनुक्रमे ४, ९ आणि ९ धावा केल्या होत्या. पण असे असानाही तो बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती.
केएल राहूलने या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. त्याने ३२ चेंडूंचा सामना करत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५० धावा केल्या. त्याच्या खेळीबद्दल बोलताना केएल राहुलने हैराण कऱणारे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, मी आधी पण चांगली खेळी केली आहे, पण मला स्कोर करता येत नव्हता. त्यामुळे आता मी सगळं ठिक करण्याचा प्रयत्न करत आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टी२० वर्ल्डकप २०२२ च्या सुपर १२ टप्प्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात चुरस पाहायला मिळाली. अॅडलेड ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा होता. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
त्यावेळी केएल राहुल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारताने १८४ धावा ठोकल्या. त्यामुळे बांगलादेशला १८५ धावांचे लक्ष्य मिळाले, जे सामन्यादरम्यान आलेल्या पावसामुळे १६ षटकात १५१ धावा झाले. पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात लिटन दासशिवाय एकाही फलंदाजाला प्रभावी खेळी करता आली नाही, त्यामुळे बांगलादेश संघ केवळ १४५ धावाच करू शकला आणि भारताने ५ धावांनी विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या-
Rohit Sharma : बांगलादेशला १ बाॅल ७ धावा लागत असताना रोहित शर्माने केली ‘ती’ चालाखी अन् सामनाच पलटला
अर्शदीपची घातक गोलंदाजी पाहून चाहते हैराण, म्हणाले, भारत सरकारला विनंती आहे की..
bacchu kadu : मुख्यमंत्र्यांनी काट्याने काटा काढला..! मंत्रिपदापासून दूर ठेवलेल्या बच्चू कडूंना शिंदेंनी दिलं खास गिफ्ट