Share

गर्लफ्रेंड अथियाला पाहिल्यानंतर केएल राहुलला नीट बॅटिंग जमत नाही, खराब फॉर्ममुळे नेटकरी संतापले

या आयपीएलमध्ये केएल राहुलची (KL Rahul) गर्लफ्रेंड अथिया शेट्टी (Athiya Shetty) सतत लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना पाहण्यासाठी येत आहे, तसेच केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सची टीम चांगली कामगिरी करत आहे. लखनौ सुपर जायंट्सला आरसीबीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी उर्वरित सामन्यांमध्ये संघाची कामगिरी चांगलीच राहिली आहे. त्याचवेळी कालच्या मॅचमध्ये केएल राहुल फ्लॉप झाला, त्यानंतर मॅच पाहायला आलेली गर्लफ्रेंड अथिया शेट्टी खूपच नाराज दिसली.( KL Rahul is not able to bat properly)

एक काळ असा होता की अनुष्का शर्मा विराट कोहलीचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जात असे, जर तेव्हा विराटची कामगिरी फ्लॉप ठरली तर चाहते अनुष्काला यासाठी दोष देत असत. आता असाच काहीसा प्रकार लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुलसोबत घडत आहे, ज्या दिवशी त्याची मैत्रीण अथिया शेट्टी मॅच पाहायला येणार आहे, त्या मॅचमध्ये तो फ्लॉप झालाच समजा. त्याचवेळी अथिया नसलेल्या सामन्यात राहुल चमकदार कामगिरी करतो.

त्याचवेळी, अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी देखील यावेळी केएल राहुलच्या सामन्यात पोहोचत आहेत, तर अलीकडेच राहुलने शतक केले. ज्याबद्दल सुनील शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, तर खुद्द केएल राहुलनेही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. सुनील शेट्टीच्या त्या पोस्टची प्रचंड चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळाली.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अथिया शेट्टी या वर्षाच्या हिवाळ्यात बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत लग्न करून तिच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करू शकते. आता प्रश्न पडतो की अथिया आणि केएल राहुल यांच्यातील रोमान्स कधी आणि कसा सुरू झाला? या खास प्रसंगी आम्‍ही तुम्‍हाला या  दोघांच्‍या गोड प्रेमकथेची ओळख करून देणार आहोत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले होते. मात्र, याबाबत अधिकृत माहिती नाही. जेव्हा दोघांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली, तेव्हा दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनीही लव्ह बर्ड्सना त्यांचे लव्ह लाईफ खाजगी ठेवण्यासाठी मदत केली. जेव्हा-जेव्हा सुनील शेट्टीला अथिया आणि राहुलच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने याला केवळ मीडिया रिपोर्ट्स म्हटले.

केएल राहुल जेव्हा त्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता, तेव्हा त्याची मैत्रीण अथिया शेट्टीनेही त्याला साथ दिली होती. दोघेही अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल बोलणे टाळताना दिसले, परंतु सोशल मीडियावर दोघांचे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो नेहमीच त्यांच्या नात्याचे सत्य उघड करतात.

महत्वाच्या बातम्या-
तब्बल एवढ्या कोटींचा मालक आहे केएल राहुल, पाच अभिनेत्रींवर आहे फिदा, आई-वडिल आहेत प्रोफेसर
गर्लफ्रेंड अथिया शेट्टीने केएल राहुलला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, तुझ्यासोबत कुठेही..
केएल राहुलचे शतक पाहून, सासरे सुनील शेट्टी स्वत:ला रोखू शकले नाहीत; म्हणाले
बाद झाल्यानंतर संतापला ईशान किशन, केलं असं काही की होऊ शकते कारवाई, पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now