KL Rahul : नुकताच ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषकाचा जबरदस्त सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरीच्या जोरावर ५ विकेट्सने भारतावर विजय मिळवला. दुसरीकडे या सामन्यात टीम इंडियाला काही खास कामगिरी करता आली नाही.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या केएल राहुलने सलग तिसऱ्यांदा चाहत्यांची निराशा केली. पाकिस्तान, नेदरलँड्सनंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही केएल राहुल मोठी धावसंख्या करू शकला नाही.
रविवारी ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात राहुलने ९ धावांवर विकेट गमावली. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा असे झाल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर केएल राहुलचा क्लास घ्यायला सुरुवात केली आहे. डावाची सुरुवात करताना केएल राहुलनेही वेन पार्नेलच्या चेंडूवर षटकार मारला.
त्यामुळे तो आज चांगली खेळी खेळू शकेल अशी सर्वांना आशा निर्माण झाली होती. परंतु, लुंगी अँगिडीच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. त्यामुळे आता चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून केएल राहुलवर प्रचंड टीका करण्यात येत आहे.
https://twitter.com/Cricupdatesfast/status/1586681284914388993?s=20&t=ZZ_uW67qvKlUdSHdRrye4Q
एका नेटकऱ्याने तर केएल राहुलला भारताच्या सर्व फॉरमॅटमधील संघातून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे. तसेच वेगवेगळे ट्विट करून केएल राहुलला प्रचंड ट्रोल केले जात आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात भारताने ४९ धावांमध्ये पहिल्या ५ विकेट्स गमावल्या.
शेवटी भारतीय संघाने या सामन्यात ९ गडी गमावत १३३ धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात ५ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. त्यामुळे या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. टी-२० विश्वचषकाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला पहिल्या पराभवाला तोंड द्यावे लागले.
महत्वाच्या बातम्या
dinesh kartik : टीम इंडियाला मोठा धक्का, आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ मॅचविनर खेळाडू जखमी
Rohit : पराभवानंतर प्रचंड भडकला रोहीत; ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार, जाहीरपणे काढली खरडपट्टी
IND VS SA : आम्ही स्वताहूनच आफ्रिकेला जिंकण्याची संधी दिली; रोहित शर्माचे सामन्यानंतर धक्कादायक वक्तव्य
ह्रदयाची धडधड वाढवणाऱ्या सामन्यात भारत अखेरच्या षटकात पराभूत, पाकीस्तान विश्वचषकाच्या बाहेर