Share

राहूलने १० फूट हवेत उडत चित्याच्या चपळाईने पकडला जबरदस्त झेल अन् बचावली टिम इंडीया; पहा व्हिडीओ

भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने दाखवून दिले की, तो एक उत्तम फलंदाज असण्यासोबतच एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे.

होय, त्याने फॉरवर्ड पॉईंट ऑस्ट्रेलियाचा सेट बॅट्समन उस्मान ख्वाजाचा एक आश्चर्यकारक झेल घेतला आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही दाताखाली बोटे दाबाल. त्याच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र पॅट कमिन्सचा हा निर्णय त्यांच्या बाजूने जाताना दिसत नाही.

उस्मान ख्वाजा फलंदाजी करताना चांगल्या लयीत दिसत होता. त्याने संवेदनशीलपणे फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांना विकेट्स दिल्या नाहीत, पण जडेजाच्या षटकात स्वीप शॉट खेळताना त्याने मोठी चूक केली.

त्याचं झालं असं की, ख्वाजा चांगली फलंदाजी करत होता. तो जडेजाच्या चेंडूला रिव्हर्स स्वीप करायला गेला होता, पण तो त्याच्या शॉट्सला योग्य टाईमिंग देऊ शकला नाही. आणि चेंडू फॉरवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या केएल राहुलच्या दिशेने गेला, तर राहुलने पॉइंटच्या दिशेने हवेत उजवीकडे झेप घेत एका हाताने उत्कृष्ट झेल घेतला.

https://twitter.com/NitinKu29561598/status/1626493024359555072?s=20

नागपूर कसोटी सामन्यात फ्लॉप ठरलेल्या ऑस्ट्रियाच्या संघाने या सामन्यात शानदार सुरुवात केली. पण संघाला पहिला डाव फार काळ ताणता आला नाही. पण कांगारूंनी 263 धावांची झुंज दिली. प्रत्युत्तरात यजमानांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 21 धावा केल्या. सध्या भारत 242 धावांनी मागे आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी अर्धशतके झळकावत संघाला दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान भारतीय संघ विकेट घेण्यासाठी धडपडताना दिसला. पण 16व्या षटकात शमीने 15 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर वॉर्नरला बाद करून ही जोडी फोडली.

यानंतर रविचंद्रनने 23व्या षटकात दोन यश मिळवून ऑस्ट्रेलियन संघाला बॅकफूटवर आणण्याचे काम केले. त्याने मार्नस लबुशेन (18) आणि स्टीव्ह स्मिथ (0) यांना आपले बळी बनवले. एका टोकाला संघाने तीन विकेट गमावल्या असताना उस्मान ख्वाजाने आघाडी घेत अर्धशतक झळकावले.

प्रत्युत्तरात, रोहित शर्मा आणि केएल राहुल भारतीय संघाचा डाव सुरू करण्यासाठी आले. या दोघांनी धमाकेदार खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोघांमध्ये 21 धावांची नाबाद भागीदारी होती.

आता दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाही डाव पुढे नेण्यासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल काम करतील. तसेच, पहिल्या दिवसाच्या अखेरपर्यंत हिटमॅनने 13 धावा केल्या आहेत, तर राहुलच्या खात्यात फक्त 4 धावा जमा झाल्या आहेत. त्याचवेळी, पहिल्या दिवसअखेर भारत ऑस्ट्रेलियापेक्षा 242 धावांनी मागे आहे.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now