Share

लवकरच लग्न करणार केएल राहुल आणि अथिया शेट्टी! सुनील शेट्टीने केला खुलासा, म्हणाला…

भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर लोकेश राहुल(Lokesh Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना अनेकवेळा एकत्र हँग आउट करताना पाहिले गेले आहे.(kl-rahul-and-athiya-shetty-to-get-married-soon)

नुकतीच राहुलची जर्मनीत सर्जरी झाली. अथियाही(Athiya Shetty) त्याच्यासोबत होती. दरम्यान, दोघांच्या लग्नाबाबतही काही बातम्या मीडियामध्ये येत होत्या. अलीकडेच अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की दोघेही लवकरच लग्न करू शकतात. दरम्यान, अथियाचे वडील सुनील शेट्टी पहिल्यांदाच यावर खुलेपणाने बोलला आहे.

सुनील(Sunil Shetty) म्हणाला, ‘नाही, अजून काही प्लॅन केलेला नाही!’ अथियाच्या लग्नाची सध्या कोणतीही तयारी नाही. सुनील शेट्टी म्हणाला की, काळ बदलला आहे आणि त्यांना काय हवे आहे हे दोघांनी ठरवायचे आहे.

तो म्हणाला, ‘ती माझी मुलगी आहे, कधीतरी तिचे लग्न होईल. माझ्या मुलाचेही लग्न व्हावे अशी माझी इच्छा आहे, जितके लवकर तितके चांगले. ही त्यांची निवड आहे. केएल राहुल बद्दल बोलायचे झाले तर, तो माणूस मला खूप आवडतो आणि काळ बदलला म्हणून त्याला काय करायचे आहे हे त्याने ठरवायचे आहे.

अलीकडेच अथिया आणि राहुल एकत्र म्युनिकला गेले होते जिथे क्रिकेटरने आपल्या कंबरेची सर्जरी केली. या भेटीनंतर अथिया आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा अनेक बातम्यांनी सुरू केला. अहवालात असेही म्हटले आहे की लग्न पुढील तीन महिन्यांत होऊ शकते.

हे कपल 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे लग्न झाले तर क्रिकेट आणि बॉलीवूडची(Bollywood)आणखी एक जोडी तयार होईल. त्यांच्या आधी विराट अनुष्का, हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोविक, हरभजन सिंग-गीता बसरा, झहीर खान-सागरिका घाटगे, युवराज सिंग-हेजल कीच, अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी यांची जोडी आहे.

ताज्या बातम्या खेळ मनोरंजन

Join WhatsApp

Join Now