‘दिल इबादत’, ‘तडप तडप’, ‘दस बहाने’ यांसारख्या गाण्यांना आवाज देणारे प्रसिद्ध गायक केके आता या जगात नाहीत. मंगळवारी संध्याकाळी कोलकाता येथे झालेल्या लाइव्ह कार्यक्रमात त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर ते हॉटेलमध्ये गेले आणि तेथे त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. ५३ वर्षीय केके यांच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.(Krishna Kumar Kunnath, Death, Concert, Heart Attack)
केके यांच्या पश्चात पत्नी ज्योती कृष्णा आणि दोन मुले तमारा आणि नकुल असा परिवार आहे. त्यांचे कुटुंबीय कोलकाता येथे पोहोचले आहेत. येथून शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल, तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. केकेने गाणी गाऊन खूप नाव कमावले.
केके आपल्या गाण्यांमधून लोकांच्या हृदयात कायमच राहील. केकेने १९९९ मध्ये ‘पल’ अल्बमद्वारे पदार्पण केले. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष गायकाचा स्टार स्क्रीन अवॉर्डही मिळाला. २००० मध्ये, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप-तडप के इस दिल’ या गाण्यासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
केके फक्त हिंदी भाषेपुरते मर्यादित नव्हते. त्यांना प्रत्येक भाषेत गाण्याची आवड होती. तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगाली आणि गुजराती भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना लाईव्ह कार्यक्रम करायला आवडत असे. फीबद्दल सांगायचे तर, केके लाइव्ह कॉन्सर्टसाठी १० ते १५ लाख आणि एका गाण्यासाठी ५ ते ६ लाख रुपये घेत असे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध गायक केके १.५ मिलियन डॉलरच्या मालमत्तेचे मालक होते. त्यांची एकूण संपत्ती सुमारे ५० कोटी होती. त्याचे घर अतिशय आलिशान आणि सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. केके यांना लक्झरी वाहनांची खूप आवड होती आणि ते अनेकदा महागड्या कारमधून प्रवास करताना दिसले.
सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. याचवर्षी, त्याने ऑडी आरएस ५ खरेदी केली, ज्याचे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले. मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की त्याच्याकडे जीप चेरोकी, मर्सिडीज बेंझ ए क्लास आणि ऑडी आरएस ५ सारख्या कार होत्या.
महत्वाच्या बातम्या-
हार्टअटॅकआधी केकेला जाणवली होती ‘ही’ लक्षणे, तुम्हीही ‘या’ ७ लक्षणांकडे कधीच नका करु दुर्लक्ष
मृत्यूनंतर पाठीमागे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती सोडून गेला केके; एका गाण्याचे मानधन ऐकून डोळे पांढरे होतील
केकेच्या निधनानंतर पाकीस्तानही बुडाला दुखात, सोशल मिडीयावर चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रीया; पहा नेमकं काय म्हणालेत..
केकेचा मृत्यू मॉब लिंचिंगसारखाच! चाहत्याने सांगितले ऑडिटोरिअममध्ये नेमकं काय घडलं…