Share

६ वीच्या मैत्रिणीसाठी केकेनं लिहीलं होतं ‘यारो दोस्ती’ गाणं अन् पुढे तिच…; केकेनं स्वत:च केला होता खुलासा

हम रहें या न रहें कल, यारो दोस्ती, जिंदगी दो पल की, दिल इबादत, सारखी तरुणाईला वेड लावणारी गाणी गाणारा प्रसिद्ध गायक केके याचे हृदयविकाराने निधन झाले. तरुणांच्या भावना सुरांमध्ये खूप अलगद ओवणारा आवाज गेला. त्याच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. त्याचे जुने व्हिडिओ, फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यारो.. हे फेमस सॉन्ग कोणासाठी तयार केलं होतं? हे त्याने एका कार्यक्रमात सांगितलं होतं. (KK had written the song ‘Yaro Dosti’ for her 6th class friend..)

केकेच्या जाण्याने दुःखात असलेले त्याचे जवळचे मित्रमंडळी त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. किस्से सांगत आहेत. अशातच कपिल शर्माच्या कॉमेडी शोवर केकेने एकदा हजेरी लावली होती. तेव्हा गप्पांमध्ये त्याने यारो दोस्ती.. हे सॉन्ग कसे तयार झाले? कोणासाठी केले होते? हा किस्सा सांगितला आहे. त्याचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

ज्योती आणि मी ६वीत असल्यापासून एकमेकांना ओळखायचो. आधी मैत्री झाली मग प्रेम. हा प्रवास खूप सुंदर होता, त्यामुळे मी हे गाणं लिहिलं, असं केकेने सांगितलं होतं. हा किस्सा फार लोकांना माहीतही नसेल. केके याने यारो.. हे गाणं त्याची पत्नी ज्योतीसाठी तयार केलं होतं.

ज्योती आणि केके एका शाळेत शिकले आहेत. त्यांची ६वी च्या वर्गात असताना मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले समजले नाही. मैत्री ते प्रेमांपर्यंतचा प्रवास फार सुंदर प्रकारे यारो या गाण्यात सांगितलं आहे. हे गाणे तरुणाईच्या मनाला भिडणारे आहे. असा कोणता मित्र परिवार नसेल कदाचित ज्यांनी त्यांच्या दोस्तांसाठी हे गाणे गायले नसेल, त्यांच्या फोटोंच्या व्हिडिओला बॅकग्राउंड म्युझिक या गाण्याचे दिले नसेल.

केकेचे खरे नाव कृष्णसुकुमार कुन्नथ असे आहे. दिल्लीत त्याला केके या टोपणनावाने ओळखलं जायचं. पुढे कला, संगीत क्षेत्रात काम करताना त्याने हेच नाव कायम लावले. केके याचे कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असताना हृदय विकाराचा झटका येऊन निधन झाले. त्याच्या निधनाच्या बातमीने संगीत क्षेत्रातील अनेक लोक त्याच्या घरी कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेले होते.

त्याच्या अंत्यविधी मुंबईत करण्यात आला. त्याच्या मुलाने त्याचे अंत्यसंस्कार केले. आज केके या जगात शरीररुपाने जिवंत नसला तरी तो त्याच्या गाण्यातून कायम जिवंत असेल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. केके त्याच्या चाहत्यांच्या मनात गाण्याच्या रूपात कायम आठवणीत राहील. त्याची गाणी तरुणांना कायम जवळची वाटतात.

महत्वाच्या बातम्या
‘या’ पक्षाचा राज्यसभेसाठी मविआला पाठींबा जाहीर; शिवसेनेला दिलासा तर भाजपला झटका
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही काळी जादू, मांत्रिकांच्या नादात पुण्यातील ७ मोठे व्यवसायिक झाले उद्ध्वस्त
निवेदिता सराफ यांनी अशोक सराफांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त केली मोठी घोषणा; वाचून कौतूक कराल

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now