VIDEO : तडफडून झाला केके यांचा मृत्यू? वारंवार पित होते पाणी; शेवटच्या क्षणांचा ‘तो’ धक्कादायक व्हिडिओ आला समोर

प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांच्या मृत्यूबद्दल अनेक अंदाज लावले जातं आहेत. गायक केके यांनी मंगळवारी रात्री वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. के.के यांच्या मृत्यूनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होतं आहे.

दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर जाण्यापूर्वी एकदम ठणठणीत असणाऱ्या के. के यांच्या तब्बेतीला अचानक झालं तरी काय? असे प्रश्न सध्या उपस्थित होतं आहेत. याचबरोबर के.केच्या निधनानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असं काय झालं की के.के यांचा मृत्यू झाला.

नाजरुल मंच ऑडिटोरियममध्ये केके यांच्या कॉन्सर्टला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी एकानं दिलेल्या माहितीनुसार नाजरुल मंच हे बंद सभागृह खचाखच भरलं होतं आणि एसी यंत्रणा देखील व्यवस्थित सुरू नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, घामाघूम झालेल्या केके यांना स्टेजवर उष्णता जाणवत होती.

त्यानंतर त्यांनी आयोजकांना त्यांच्यावरील स्पॉटलाइट्स मंद करण्यासही सांगितलं होतं. सभागृहातील गर्दीबाबतही केके यांनी आयोजकांकडे तक्रार केल्याची माहिती आता समोर आली आहे. मात्र असे असले तरी देखील शवविच्छेदनातूनच केके यांच्या मृत्यूच खरं कारण समोर येणार आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गायक के.के यांचे कुटुंबीय कोलकाताला पोहोचले आहेत. के.के. यांचे शवविच्छेदन थोड्याच वेळात एस.एस.के.एम रुग्णालयात सुरू करण्यात येणार असल्याच समजत आहे. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

के.के यांच्या मृत्यूनंतर धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत. मिळालेल्या  माहितीनुसार, जेव्हा के.के रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. मात्र, या सर्व गोष्टी पोस्टमार्टमनंतरच उघड होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या याप्रकरणी न्यू मार्केट पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
गायक केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं! डोक्यावर जखमांच्या खुणा; पोलिसांनी घेतली ‘ही’ ॲक्शन
वा रे पठ्ठ्या! तिकीटाच्या 2 रुपयांसाठी रेल्वेला खेचलं कोर्टात, शेवटी केस जिंकत मिळवले अडीच कोटी
पुणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने रुपाली पाटलांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
बॉलिवूडवर शोककळा! सुप्रसिद्ध गायक केकेचं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये निधन, ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची