Share

गायक केकेचे शेवटच्या क्षणांचे व्हिडीओ व्हायरल; पाहून तुमच्याही डोळ्यांतील अश्रू थांबणार नाहीत

ke ke

काल प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक केके (Singer KK) उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचे निधन झाले आहे. केके यांच्या  अचानक झालेला मृत्यूने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. केके यांच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होतं आहे.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. केकेच्या मृत्यूनंतर गुरुदास कॉलेजमधील त्यांच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या कॉन्सर्टमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये केके ‘कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल…’ गाणं गाताना दिसत आहे.

https://twitter.com/maryashakil/status/1531711001569075200?s=20&t=Xa_GFxfe6b9yalSOnAM4bw

हा व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत. त्यांच्या शेवटच्या गाण्याचे व्हिडिओ शेअर करून चाहते भावूक होत आहेत. आज ‘हम रहे या ना रहे कल…’ पल याद आयेंगे पल या त्यानेच गायलेल्या गाण्याच्या ओळी लागू पडत आहेत. त्याच्या शेवटच्या कार्यक्रमाचे अनेक विडिओ त्याच्या फॅन्सनी शेअर केले आहेत.

दरम्यान, कोलकात्याच्या गुरुदास कॉलेजच्या फेस्टमध्ये परफॉर्म करत असताना गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ के.के यांची तब्येत बिघडली. प्रेक्षकांसमोर गाणं सादर करताना ते सहकाऱ्यांना तब्येतबद्दल वारंवार सांगत होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

विशेष बाब म्हणजे, हिंदीशिवाय मराठी, गुजरातील, मल्याळम, बंगाली, तेलुगू, तामिळ, कन्नड गाण्यांनाही त्यांनी आपला आवाज दिला. केके यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहे. तडव तडप के, खुदा जाने, अजब सी, तूही मेरा शह है पासून देसी बाॅइज, तसं बहाने… अशा पाॅप कल्चरला जवळ जाणाऱ्या अनेक प्रकारच्या गाण्यांना केके यांचा आवाज होता.

दरम्यान, गायक के.के यांच्या निधनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या याप्रकरणी न्यू मार्केट पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. जखमांमुळे पोलीस हॉटेल स्टाफची चौकशी करत आहेत. के.के यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर दुखापतीच्या खुणा आढळल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
गायक केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं! डोक्यावर जखमांच्या खुणा; पोलिसांनी घेतली ‘ही’ ॲक्शन
वा रे पठ्ठ्या! तिकीटाच्या 2 रुपयांसाठी रेल्वेला खेचलं कोर्टात, शेवटी केस जिंकत मिळवले अडीच कोटी
पुणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने रुपाली पाटलांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
बॉलिवूडवर शोककळा! सुप्रसिद्ध गायक केकेचं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये निधन, ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची

इतर ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now