Share

किशोरी शहाणेंच्या मुलाला चित्रपटसृष्टीत काम मिळणे झालंय कठीण; म्हणाल्या, ‘एक तरी संधी द्या, तो ऑलराऊंडर आहे’

kishori shahane

किशोरी शहाणे (kishori shahane) या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मागील ३५ वर्षापासून त्या सिनेसृष्टीत कार्यरत असून आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. किशोरी त्यांच्या कामाने समाधानी आहेत. मात्र, त्यांची एक तक्रार आहे की, सिनेसृष्टीतील सध्या नावाजलेले सेलिब्रिटी नवीन लोकांना संधी देत नाहीत.

किशोरी यांचे म्हणणे आहे की, त्यांचे पती दीपक बलराज यांनी अनेक नवीन लोकांना संधी दिली आहे. यामध्ये अनेक अभिनेत्यांसोबत गायकांचाही समावेश आहे. तेव्हा त्यांच्या मुलाला एक तरी संधी देण्यात यावी. पण तसे होत नाही. आता बॉलिवूडमध्ये करिअर करणे अवघड झालं आहे, असे त्यांचे मत आहे.

आजतकच्या एका वृत्तानुसार, किशोरी यांना त्यांचा मुलगा बॉबी विजला चित्रपटात काम मिळत नाहीये, याची चिंता लागली आहे. किशोरी यांनी म्हटले की, ‘माझा मुलगा लहान वयापासूनच नाटकांत काम करत आलेला आहे. आम्हाला वाटते की, त्याला सिनेसृष्टीत ओळख मिळावी आणि त्याला एक चांगली संधीसुद्धा मिळावी. आम्ही जर आमच्या आयुष्यातील इतका वेळ इंडस्ट्रीला दिला आहे तेव्हा कमीत कमी माझ्या मुलालाही चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे’.

पुढे त्यांनी सांगितले की, ‘मला त्याच्या प्रतिभेवर विश्वास आहे. तो ऑलराऊंडर आहे. ज्याच्याशी तो बोलतो त्याला तो आवडतो. लोक त्याच्याशी बोलतात पण अचानक काहीतरी घडतं आणि बोलणी थांबतात. किशोरी यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलाच्या प्रतिभेवर त्याला काम देण्यात यावं. पण ती प्रतिभा दाखवण्यासाठी त्याला निदान एक संधी तरी द्यावी.

किशोरी यांचे सिनेसृष्टीतील अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत. असे असतानाही त्यांनी मुलासाठी कधी कोणाकडे कामाची मागणी केली नाही. यासंदर्भात बोलताना त्यांनी म्हटले की, ‘मी आतापर्यंत बॉबीला कोणाकडेही घेऊन गेले नाही. पण लवकरच मी त्याला सर्वांची भेट घालवून देणार आहे. मला कोणासोबतही तक्रार नाही. पण मी थोडी नाराज आहे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, किशोरी शहाणे यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटात काम केले आहेत. तसेच बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्येही त्या दिसल्या होत्या. सध्या त्या स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत त्या पोलीस इन्स्पेक्टर विराट चौहनच्या काकूची भूमिका साकारत आहेत. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या निर्मात्या आणि डान्सरसुद्धा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट’; महेश टिळेकरांचा मराठी कलाकारांना टोला
अनुपम खेर यांचे शर्टलेस फोटो व्हायरल; फिटनेसच्याबाबतीत अनिल कपूर यांनाही देताहेत टक्कर
अवॉर्ड शोमध्ये ‘बबीता जीं’ना पाहून जेठालालचे झाले असे हाल; नेटकरी म्हणाले, ‘जेठालाल लाजत आहे’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now