मात्र असं असलं तरी देखील आता वेगळीच बातमी समोर येत असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या एका बड्या आमदाराने सुरक्षा काढून घ्या, अशी मागणी केल्याने भाजपच्या गोटात सध्या अनेक नेते मंडळी चिंतेत आहेत. आम्ही जनतेतूनच निवडून आलो आहोत, मग जनतेची भीती कशाला, असा सवाल भाजप आमदाराने केला आहे.
वाचा सविस्तर नेमकं प्रकरण काय?
भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या अजब मागणीची सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. सरकारने दिलेली सुरक्षा काढून घेण्याबाबत त्यांनी थेट गृहविभागाला एक पत्र पाठवल आहे. यामुळे आता कथोरे यांच्या मागणीवर गृहविभाग काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
माध्यमांशी बोलताना कथोरे यांनी म्हंटलं आहे की, जे जनतेतून निवडून येतात त्यांना जनतेत वावरताना जनतेचीच भीती कशाला? असा सवाल करत माझं सुद्धा पोलीस संरक्षण सरकारने काढून घ्यावं, अशी विनंती त्यांनी सरकारवर केली आहे. यावर अद्याप भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.
पुढे बोलताना कथोरे यांनी म्हंटलं आहे की, उद्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सगळे सरपंचही पोलीस संरक्षण मागतील, त्यांना सुद्धा सरकार संरक्षण देत बसलं, तर गृह विभागावर किती भार पडेल? असा सवालही त्यांनी केला आहे. यावर आता गृहविभाग काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला एक पोलीस उपनिरीक्षक आणि पाच पोलीस कर्मचारी, असं संरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस दलावर मात्र आधीच कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असताना अतिरिक्त भार पडत असल्याच बोलल जातं आहे.
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर






