Share

संगीत क्षेत्रावर कोसळला दु: खाचा डोंगर! सर्वात जेष्ठ गायिकेने पुण्यात घेतला अखेरचा श्वास

kirti shiledar

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार (kirti shiledar) यांचं आज पहाटे निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. आज अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (kirti shiledar passes away)

सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमीवरील जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. काही वेळात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, २०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यांची एकमताने निवड झाली होती. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी फार मोठं योगदान दिलं. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्यानंतर त्या थांबल्याच नाहीत. जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता.

दरम्यान, प्रसिद्ध जेष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण आणि न्युमोनियाच्या आजारामुळे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आणि अभिनय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर हे लतादीदींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

त्यांची बहिण उषा मंगेशकर यांनी लतादीदींच्या प्रकृतीविषयी माहिती देत चाहत्यांना आणि प्रियजनांना भावनिक आवाहन केलं आहे. उषा मंगेशकर याविषयी माहिती देताना म्हणाल्या की लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे परंतु त्यांनी आजारावर अजूनही मात केलेली नाही.

त्यांची प्रकृती स्थिर होत असली तरी त्या कधीपर्यंत घरी परततील हे सांगता येत नाही. रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळेल हे अजून निश्चित नाही. सगळं काही डॉक्टरांवर अवलंबून आहे. असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या की, लतादीदींच्या प्रकृतीविषयी काही प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट आणि चुकीच्या बातम्या देण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
उत्पल पर्रीकरांनी मोदी-शहांनाही नाही जुमानले! घेतला ‘हा’ अनपेक्षीत निर्णय; भाजपला हादरा
मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून मला भाजपने तिकीट दिले नाही; माजी मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप
शिक्षण अधिकाऱ्यांचे डिसले गुरूजींवर खळबळजनक आरोप, डिसले गुरूजी राजीनामा द्यायच्या तयारीत
‘ही’ उदाहरणे देत शरद पवारांचा कोल्हेंना जाहीर पाठींबा; नथूरामच्या भूमिकेचे केले समर्थन

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now