Share

काका-पुतण्यात खडाजंगी! मनसेचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान; ‘मातोश्रीत बसलेल्यांनी…’

raj

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. काल रामनवमीचे औचित्य साधून मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेनं थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं.

यावरून शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपले काका असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर घणाघाती टीका केली. “स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही”, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेला सणसणीत प्रत्युत्तर दिले.

मनसेच्या सदर प्रकरणार बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात, ‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. तसेच स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. याचाच धागा पकडत आता मनसे नेत्यांनी पलटवार केला आहे.

“शिवसेना संपली” अशी ओरड काँग्रेसने अनेकदा केली, पण बाळासाहेबांनी शिवसेनेला अखेर उभं केलंच, त्यांच्याच परिश्रमाची सत्ताफळं आज मातोश्रीत बसून आदित्य ठाकरे खात आहेत,” असे मनसेचे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी ट्विट करून आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

https://twitter.com/KirtikumrShinde/status/1513079293978431488?s=20&t=ts5d3qnQlrGCukRzU0hDKQ

ट्विटमध्ये पुढे किर्तीकुमार शिंदे म्हणतात, ‘राहिला प्रश्न मनसेचा; मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात. कोण संपलंय, हे त्यांना कळेल, असे किर्तीकुमार शिंदे यांनी यांनी थेट आदित्य ठाकरे यांना खुलं आव्हान दिले आहे. सध्या मशिदींवरील भोंग्यांवरील प्रकरणामुळे शिवसेना विरुद्ध मनसे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

दरम्यान, मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकाराने शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा भोंगाद्वारे लावण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच भोंगे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आले. मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ‘आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी का अटक केली हे माहीत नाही. शिवसेना भवन हे काही मुस्लिमांचं स्थळ नाही. हिंदुत्ववाद्यांचं कार्यालय आहे. त्यामुळे तिथे हनुमान चालिसा म्हटलं तर बिघडलं कुठं? असा संतप्त सवाल मनसेने केला.

महत्त्वाच्या बातम्या
‘सरकारी व्यक्ती काम न करण्याचा पगार घेतो आणि काम करण्यासाठी रिश्वत’, आभिषेक बच्चनच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर नेटकरी भडकले
महाराजांची ‘ती’ चुक अन्…; कीर्नकारांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं खरं कारण आलं समोर
तृप्ती देसाई भडकल्या; ‘परक्या व्यक्तीसोबत केलेला संभोग हा खासगी विषय आहे, परंतु…’
शाहरुखच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे जया बच्चनचा चढला होता पारा; कानशिलात मारण्याची झाली होती इच्छा, जाणून घ्या नेमकं प्रकरण

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now