प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील या त्यांच्या कीर्तनाच्या शैलीमुळे लोकप्रिय होत्याच, मात्र आता बिगबॉस मध्ये सहभागी झाल्यापासून त्या अधिक चर्चेत येतात. आपल्या कीर्तनातून त्या समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, त्यासोबतच विनोदाची पेरणी करत कीर्तन सादर करतात.
त्यांच्या कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारा वर्ग देखील मोठा आहे. शिवलीला पाटील या त्यांच्या आयुष्यातील अपडेट्स सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती त्यांच्या नव्या फॅमिली मेंबरची. त्यासाठी चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील करत आहेत. शिवलीला यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाचं शिवलीला यांनी खास सेलिब्रेशन केले आहे. त्यांनी वाढदिवसानिमित्त एक नव्हे तर दोन दोन गाड्या खरेदी केल्या आहेत.
शिवलीला यांनी सोशल मिडियावरून चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी एक फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर खरेदी केली आहे. हे त्यांच्या घरी आलेले नवीन फॅमिली मेंबर आहेत. चाहत्यांनी याबद्दल शिवलीला पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
शिवलीला पाटील यांनी त्यांच्या नवीन टू व्हीलर समोर उभा राहून काढलेला फोटो पोस्ट केला आहे, त्या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवलीला पाटील या नुकत्याच झी टॉकीजवरील मन-मंदिरा-गजर भक्तीचा या कार्यक्रमात दिसल्या होत्या.
शिवलीला पाटील या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. यामुळे वारकरी संप्रदाय आणि वारकरी संघटना त्यांच्यावर नाराज होत्या. त्यासाठी त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी ‘बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक होती’असे म्हणत वारकरी संप्रदायाची माफी मागितली.