मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स पाहिल्यामुळे वादात सापडलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा जय पवार यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.(kirit sommya big statment on ajit pawar son)
एका मुलाखतीत किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्याबद्दल भाष्य केले. भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, “अजित पवार यांची एक हजार पंचावन्न कोटींची बेनामी संपत्तीं घोषित झाली आणि जप्त झाली. आता पुढे काय होते ते पहा. अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचे देखील कारनामे लवकरच बाहेर येतील”, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले.
त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या आता कोणता नवा गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांच्यावर वक्तव्य केले होते. बेनामी गुंतवणूक करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची खरेदी केली, असा आरोप किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर केला होता.
सर्व नियमांचे उल्लंघन करून अजित पवार यांनी स्वत:चा कारखाना स्वत:लाच विकला, असे किरीट सोमय्या म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाजप नेते किरीट सोमय्याना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. “कोणी काही आरोप करत असले तरी त्याच्याकडं पुरावा मागितला जाईल. नुसत्या बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.
“कुठल्याही गोष्टीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत, त्यांना चौकशीचे अधिकार आहेत. त्या चौकशी करतीलच, दुसरं कुणी करणार आहे का”, असा सवाल देखील अजित पवार यांच्याकडून किरीट सोमय्यांना विचारण्यात आला होता. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
‘मी कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांमध्ये कारवाईची हिम्मत नाही, मी चॅलेंज करतो मला हात लावून दाखवा’, असे देखील भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. यानंतर आपण उद्या कर्जतला जाणार असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले. पेशव्यांची वैजनाथ इथली हिंदू देवस्थानची जमीन सलीम बिलाखियाच्या नावाने कशी गेली याची चौकशी करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
प्रियांका चोप्रा आई झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली…
पहाटे ३ ला उठून योगा, उकडलेले अन्न; ‘अशी’ आहे १२६ वर्षे वय असलेल्या बाबा शिवानंद यांची दिनचर्या
घरी कोणीही नसताना १० वर्षांच्या मुलाने घरातच घेतली फाशी, टीव्हीवर रोज पाहायचा क्राईम पेट्रोल