सध्या राज्याच्या राजकारण भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी किरीट सोमय्यांसाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. आता त्यावरुनही चांगलेच राजकारण तापले आहे. (kirit somayya slams sanjay raut)
तसेच काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना किरीट सोमय्यांनी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, “मला एकदाच काय ते सर्व शिव्या देऊन टाका, रोज रोज मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या आईला शिव्या देऊ नका,” असं उत्तर दिलं होतं.
आज भाजप नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya) पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना सोमय्यांनी पुन्हा राऊतांना लक्ष केले. संजय राऊतांना त्यांनी दिलेल्या *** या शिवीचा अर्थ कळतो का?, असा सवाल करत अर्थ कळत नसेल तर माझ्या बायको आणि आईला जाऊन विचारा, असं म्हणाले.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, ‘माझी बायको आणि माझ्या सूनबाई दोघीही मराठी आहेत. अशा प्रकारची शिवी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंतर्फे संजय राऊत देतात. कारण मी त्यांची चोरी लबाडी लोकांसमोर आणली. त्यांचे घोटाळे लोकांसमोर आणले म्हणून मला शिवीगाळ करत आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांना कोविड, वाइन असे सगळे घोटाळे लपवायचे आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. माझ्या विरोधात काही सापडत नाही आहे म्हणून हे जुन्या केसमध्ये मला अडकावत असल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच सोमय्या यांनी केलेल्या टीकेवरून आता पुन्हा राजकारण तापणार आहे, यात काही शंका नाही.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले होते. किरीट सोमय्यांनी सवाल उपस्थित केला होता की, केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोनिया गांधींकडून परवानगी घेण्यात आली का?
त्यावर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं होतं. हे लोक चु# आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात अशा चु# लोकांना स्थान उरणार नाही, अशी जळजळीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आज पुन्हा सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
देशी दारूसाठी तरूणाने केला शोले स्टाईल धिंगाणा, टॉवरवर चढला आणि.., वाचून पोट धरून हसाल
सिद्धार्थने प्रेमाने मिठी मारताच लाजली कियारा अडवाणी, व्हिडीओ सोशल मिडीयावर झाला तुफान व्हायरल
भारताचा तो पंतप्रधान जो पाकिस्तानच्या पंतप्रधानांना तोंडावर म्हणाला होता, ‘तुम्ही खुप बदमाशी करता’
डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी, महिलेच्या पोटातून काढली तब्बल एवढ्या किलोची गाठ