आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (उद्या) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली. तसेच या पत्रकार परिषदेला पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी हजर असतील. उद्या आम्ही बोलू आणि संपूर्ण देश ऐकेल, असं राऊत म्हणाले. (kirit somayya challenges sanjay raut over shivsena press conference)
याचाच धागा पकडत माध्यमांशी बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. ‘राऊतांमध्ये कोणत्याच प्रश्नाची उत्तरं देण्याची हिंमत नसून ते खोटारड्यासारखी नाटकं करतात. विषयावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका सोमय्यांनी केली. तसेच राऊत साहेब तुरुंगात अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, असे ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘चोख उत्तर देण्याची राऊत यांच्यामध्ये हिंमत नाही. त्यांचे आणि प्रवीण राऊत यांचे संबंध आहेत. प्रवीण राऊत जेलमध्ये आहेत. प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकरचे संबंध काय?, सुजीत पाटकरच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर शिवसेना नेत्यांनी कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, ‘आमच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांना आम्ही प्रत्युत्तर देऊ. भाजपचे नेते हा नेता जेलमध्ये जाईल, तो नेता अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठडीत असेल, असे राऊत म्हणाले आहेत. पण पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचे ‘साडेतीन लोकं’ हे अनिल देशमुख यांच्याच कोठडीत असतील, असे भाकीत राऊत यांनी केले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना नेते, ठाकरे कुटुंबावर सातत्यानं आरोप सुरू आहे. या सगळ्या आरोपांना उद्या आम्ही शिवसेना भवनातून उत्तर देऊ. उद्या काय होतं ते पाहाच. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा त्यांनी ओलांडली आहे. आता पुढे काय होतंय ते बघा, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला आहे.
तसेच हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, असे म्हणत राऊत यांनी चांगलाच भाजपचा समाचार घेतला आहे. आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, आता आम्ही आरोप करणाऱ्यांना उद्ध्वस्त करु. राज्यात आमचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्त्व शिवसेनेकडे आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, असे देखील राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! आता वाहन चालवताना फोनवर बोलणे गुन्हा नाही, पण करावे लागेल ‘या’ नियमांचे पालन
‘व्हॅलेंटाईन-डे’च्या निमित्ताने मलायका आणि अर्जूनने एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो केले शेअर; सोशल मीडियावर व्हायरल
‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देणाऱ्या मुलीला सलमान-आमिरने दिले ३ कोटी रूपये? वाचा व्हायरल पोस्टमागचे सत्य
माहिती कामाची: ‘या’ 4 टिप्समुळे वाढेल स्मार्टफोनची बॅटरी लाइफ आणि बॅटरी हाय स्पीडने होईल चार्ज