ठाकरे सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपरमार्केटमध्ये वाईन विकता येणार असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक त्यांच्यावर आक्रमक झाले असून सत्ताधारी नेत्यांवर टीका करत आहे. (kirit somaiya reply to sanjay raut)
कोणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किरीट सोमय्यांचा मुलगा चणे, शेंगदाणे विकतो का?, भाजपवाल्यांची मुले केळी विकतात का?, अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना केला होता.
आता माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. कोण ढोकळा विकतो आणि कोण काय करतो ते सोडा. तुम्हाला वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते आधी सांगा, असं आव्हान सोमय्या यांनी दिलं आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी राऊत यांना काही सवाल केले आहे.
सोमय्या म्हणाले, “राऊत यांच्या कुटुंबातील कोणीही उद्योग-व्यवसायात नाही. मग अशोक गर्ग यांनी त्यांना पार्टनरशीप कशी दिली? राऊत यांनी उद्धव ठाकरेंसोबत सेटलमेंट घडवून आणलीय का? पडद्या मागे काय लपवत आहात. या वाईन उद्योगाची 100 कोटींची उलाढाल आहे. त्याचे लाभार्थी कोण आहेत? कोण ढोकळा विकतो, कोण केळी विकतो हे ढोंग बंद करा. पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?”
दरम्यान, संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपवर आपली भूमिका मांडली होती. ‘आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी आमच्या नावावर असेल, तर मी सोमय्यांच्या नावावर करुन द्यायला तयार आहे, असे राऊत यांनी म्हंटले होते.
कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुले रस्त्यावर केळी विकतात का?, अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?’ असा सवाल संजय राऊत यांनी सोमय्यांना केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
‘पुढचे 25-30 वर्षे आम्हीच असणार, काहीही झालं तरी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही’
“महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी; मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या”
सलमान अफजल तर मी छत्रपती शिवाजी महाराज, कोथळा बाहेर काढेन; बिचुकलेचे वादग्रस्त वक्तव्य
बिचुकलेने सलमानला दिली आता थेट धमकी; म्हणाला, सलमान अफजल खान तर मी..