भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर पुन्हा एकदा एक गंभीर आरोप केला आहे. राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवल्याचा असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. “ठाकरे यांनी कंपनी ब्लॅकलिस्ट केली. त्यात लिहिलं की या कंपनीला आता महाराष्ट्रात एकही कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना ४ कॉन्ट्रॅक्ट दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊतवर गुन्हा दाखल करावाच लागणार आहे.
तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. शेकडो लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय. कोविडचे एक एक घोटाळे जेव्हा बाहेर येतील तेव्हा यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही,” असे सोमय्या म्हणाले. पैशासाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
तसेच पुढे बोलताना त्यांनी संजय राऊत यांना खुलं आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर मुलीचे कोणत्या कोणत्या हॉटेल्समध्ये कार्यक्रम झाले याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं असं म्हणत तुम्ही सांगणार की मी ऑडीट करू? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्यांनी याप्रकरणातील त्या चहावाल्या शोधून काढले आहे. त्या चहावाल्याच्या शोधात सोमय्या मुंबईच्या केईएम रुग्णालयासमोरील एका हॉटेलमध्ये पोहचले.
पुण्यातील कोव्हिड सेंटरचं (covid center) कंत्राट एका चहावाल्याला महाविकास आघाडीने दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. राजीव साळुंखे नावाच्या चहावाल्यावर सोमय्या यांनी हे गंभीर आरोप केले होते. सोमय्यांनी यांनी म्हंटले की, ‘पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे 100 कोटींचे कंत्राट मुंबईतील सह्याद्री हॉटेल मालकाला देण्यात आले. राजीव साळुंखे यांच्या नावे हॉटेल आहे. ठाकरे सरकारने जम्बो कोविड सेंटरप्रकरणी घोटाळा केला आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्याने उडाली खळबळ
अरे देवा! वडिलांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांच्या चिमुकलीवर आली कुटुंबाची जबाबदारी, वाचा नेमकं काय घडलं..
नाद नाय! इशान किशन, दीपक चाहरपाठोपाठ हे खेळाडू झाले मालामाल, वाचा खेळाडूंची संपुर्ण यादी
पंतप्रधान मोदींना सत्तेपासून दूर करु, आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू; मुख्यमंत्री संतापले