सध्या राज्याच्या राजकारणात एकमेकांवर टीकेची झोड उठत आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानावरून वाद सुरू असतानाच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. (kirit somaiya is item girl in politics says nawab malik)
मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली. नवाब मलिक यांनी म्हटले की, एखाद्या चित्रपट चांगला चालावा यासाठी चित्रपटात आयटम गर्लची आवश्यकता असते. किरिट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपच्या आयटम गर्लप्रमाणे आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी राजकारणातील आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका मलिक यांनी केली.
दरम्यान, सोमवारी किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून फायली तपासल्या, यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. सोमय्यांनी माहिती अधिकारात फाइल्स तपासण्याची परवानगी घेतली नसेल, तर त्यांच्यावर शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणानंतर सोमय्या यांनी याबाबत भाष्य केले. “त्यांना नेमकी भीती कसली आहे, कोणत्या कोणत्या फाईल तपासल्या त्याची की वायकरची फाईल होती, की सरनाईकची फाईल होती की अशोक चव्हाण यांची फाईल होती याची भीती आहे? मला वाटतं भीती ती आहे. आम्हाला जगभरातून माहिती मिळते. वेगवेगळ्या स्तरावरून लोक माहिती देतात. घोटाळेबाजांची माहिती दिली जाते. यात उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाण यांच्यापर्यंत समावेश असतो,” असे सोमय्या यांनी म्हटले.
तसेच सोमय्या यांनी सातत्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांविरोधात आरोपांची मालिकाच सुरू केली होती. या पक्षांच्या काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाईदेखील सुरू केली आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून होणाऱ्या आरोपांना राष्ट्रवादीकडूनही जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
फक्त २४ रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदार झाले लखपती, २३ दिवसात १ लाखांचे झाले ३.७५ लाख
रवी शास्त्री यांचा खळबळजनक दावा; ‘आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, पण…’
बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वाचा वर्ध्यातील अपघाताचा थरारक घटनाक्रम
डॉक्टरची पत्नी पडली कुरिअर बॉयच्या प्रेमात, दोन वर्षे मजा मारली आणि नंतर..