Share

पोलिस अधिकारी हेमंत करकरेंच्या मृत्यूला उद्धव ठाकरेंच्या जवळचा ‘हा’ शिवसेना नेता जबाबदार

udhav

राणा दाम्पत्याला अटक झाल्यापासून राज्यातील राजकारण तापलेले आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याने त्यात आणखी भर टाकली. शिवसैनिक आणि सोमय्या यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. अजूनही किरीट सोमय्या हे शिवसेनेला टार्गेट करताना पाहायला मिळत आहे.

पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्यांनी थेट पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे.

‘य़शवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे राईट हँड आहेत. जाधव यांनी जवळपास १ हजार कोटींचा घोटाळा केला आहे,’ असंही यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले. पुढे सोमय्या म्हणतात, “बिमलकुमार रामगोपाल अग्रवाल यांची तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक होऊन ते सध्या जामिनावर आहेत.’

तसेच ‘समर्थ इरेक्टर डेव्हलेपर्स ही बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधव यांची भागीदारीमधील कंपनी आहे. या कंपनीने बद्री प्राईव्हेट लिमिटेड कंपनीकडून काही महिन्यांपूर्वी मलबार हिल येथे रि डेव्हलपमेंट प्रोजेक्ट 80 कोटी रुपयांना विकत घेतला होता,’ अशी माहिती देखील सोमय्या यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

दरम्यान, ‘२६/११ हल्ल्यात हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट हे बोगस होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवले होते,’ असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून हे जॅकेट पुरवले गेले होते. ही कंपनी यशवंत जाधव आणि बिमल अग्रवाल यांनी पार्टनर कंपनी आहे, अस सोमय्या म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मंत्री नवाब मलिक हे दाऊचे पार्टनर आहे तर उद्धव ठाकरे यांची कसाबशी व्यावासायिक संबधं. मी जाणीवपूर्वक सांगू शकतो की मलिक यांचे संबंध दाऊद गॅंगपर्यंत पोहचू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत आहेत, असं सोमय्या म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-
७५ पैशांचा शेअर गेला २ हजारावर; १ लाखाचे झाले २७ कोटी; ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ
जबरदस्त! ७५ पैशांच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न, १ लाखाचे झाले २७ कोटी
४ करोडचं घड्याळ ते चार्टड प्लेन, Jr NTR ची संपत्तीचा आकडा वाचला तर बॉलिवूडकरही पडतील फिके

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now