सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्राकडून तपास यंत्रणाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप एकीकडे महाविकास आघाडीमधील नेते करत आहेत, तर दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पेटला आहे. ((kirit somaiya criticised maha vikas aghadi sharad pawar and uddhav thackeray over ed action)
अशातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत यांच्या धडपडीवरून लक्षात येतंय की आता कुणाची बारी आहे, असा सूतोवाच सोमय्यांनी केला आहे. याबाबत ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर, पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी, असा सणसणीत टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावं जाहीर केली आहेत.
मलिक यांच्यानंतर आणखी बारा जण आहेत, जे जेलमध्ये जातील, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, मी संजय राऊत नाही. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचे नाव राऊत सांगू शकले नाही. कुठे आहे वाधवान? आम्ही कागदपत्रांसह सांगतो. आता १२ नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काढू द्या. कोणत्या नेत्याला आधी तुरुंगात पाठवायचे, हे त्यांना ठरवू द्या, असं सोमय्या यांनी म्हंटले.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1496763567726493696?s=20&t=BrisSY7iP8h-DujrnQxWDg
दरम्यान, सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’ यादीमध्ये महाविकास आघाडी सरकरमधील अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसुळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड या नेत्यांची नाव आहेत. तसेच या नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या आज दिल्लीत जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
किंग खानचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण अभिनयाच्या ऐवजी करणार ‘हे’ काम
महाविद्यालयीन विद्यार्थ्याने संपवले जीवन; सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण आलं समोर
एक गुण वाढवण्यासाठी तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढला, बोर्डाने चुक मान्य करत वाढवले २८ गुण
रशिया-युक्रेन युद्धामुळे सोयाबीनचे भाव वाढले, शेतकऱ्यांना मिळाला मोठा फायदा