‘मुलगी झाली हो’ मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे विलास पाटीलची भूमिका साकारणार आहे. किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यात किरण माने यांनी साकारलेली विलास पाटीलची भूमिका कोण साकारणार याबाबत चर्चा सुरू होती.
मात्र अद्याप प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. आनंद याआधी ‘रुद्रम’ मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. तसेच त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्येदेखील महत्वाची भूमिका साकारली आहे. माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार आता तुम्हाला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे विलास पाटील पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे.
याशिवाय त्याने ‘बंदिशाळा’, ‘जोगवा’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. तसंच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. परंतु आता तो ‘मुलगी झाली हो’ मालिकेत विलास पाटीलच्या भूमिका कशी साकारणार आणि तो किरण माने यांची जागा घेऊ शकले का? असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांना पडले.

दरम्यान, राजकीय पोस्ट केल्यामुळे मला मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे, असा गंभीर आरोप किरण माने यांनी केला होता. त्यानंतर लोकांनी आणि अनेक कलाकारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता. पण त्यानंतर मालिकेतून महिला कलाकारांनी किरण माने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माने हे सतत आम्हाला टोमणे मारायचे. किरण माने यांच्यामुळे ही मालिका चालते, असा गैरसमज त्यांचा झाला होता. मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी कुणालाही काढून टाकेन अशी भाषा ते वापरायचे, असा दावा मालिकेतील सहकलाकारांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेंना जोरदार धक्का! संपुर्ण जिल्ह्यात भाजपचा दबदबा, राष्ट्रवादीचा दारूण पराभव
मृत्युुच्या आधी आजोबांनी असा कानमंत्र दिला की नातू झाला थेट कलेक्टर, वाचा यशोगाथा
कौतुकास्पद! बहिणीने टेलरिंगचे काम करून भावाला शिकवले, भावाने कलेक्टर होऊन नाव कमावले
‘’महाविकास आघाडीने धनशक्ती, दंडशक्तीचा कितीही वापर केला तरीही भाजपच एक नंबर’’