‘मी खोटा असतो तर एवढा खवून आन् उचकून लढलो नसतो भावानों’, किरण मानेंची आणखी एक पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे मागील काही दिवसांपासून माध्यमात सातत्याने चर्चेत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर काही काळ प्रोडक्शन हाऊस आणि किरण माने यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरुच होते. त्यामुळे राज्यभरात एकच गोंधळ उडाला होता.

राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला मालिकेतून काढण्यात आले, असा आरोप किरण माने यांनी केला होता. तर किरण मानेच्या गैरवर्तनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्टार प्रवाह वाहिनीद्वारे सांगण्यात आले. तसेच या मालिकेतील काही महिला कलाकारांनी एका वाहिनीसोबत बोलताना किरण मानेंवर अनेक आरोप केले होते.

नुकतीच ४ फेब्रुवारी रोजी किरण माने यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणावर त्यांची बाजू मांडली होती. तसेच यावेळी त्यांनी मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसवर अनेक गंभीर आरोप केले होते. यासंदर्भात त्यांनी प्रोडक्शन हाऊसला कायदेशीर नोटीस पाठवत ५ कोटींची नुकसान नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

याशिवाय प्रोडक्शन हाऊसने त्यांची लेखी माफी मागावी आणि ज्या महिलांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांनीही माफी मागावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती. त्यानंतर आता किरण माने यांनी एक नवीन पोस्ट शेअर करत त्यांची लढाई पूर्णपणे कायदेशीर आणि संवैधानिक असल्याचे म्हटले आहे. तसेच ही कायदेशीर लढाई जिंकणारच, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. पहा किरण माने यांची पोस्ट.

https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10224748630450700

महत्त्वाच्या बातम्या :
…आणि फक्त ८ दिवसांतच मंगेशकरांना काढून टाकलं; तो किस्सा सांगत मोदींनी दाखवला काँग्रेसला आरसा
लतादीदींच्या वडिलांच्या पिंडाला शिवत नव्हता कावळा, तेव्हा लतादीदींनी ‘ही’ प्रतिज्ञा घेतली अन् कावळा शिवला
लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी का गायली नाही? प्रकाश आंबेडकर म्हणाले…